सांगली : लग्नात झालेल्या खर्चाची मागणी करून विवाहितेचा छळ होत असल्याची तक्रार केली म्हणून पीडिता आणि तिच्या वडिलांना शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत काजल प्रशांत मोरे (वय २९, सध्या रा. खणभाग, सांगली) यांनी दिली आहे.
फिर्यादी काजल मोरे या नोकरी करत असून त्यांचा विवाह पनवेल येथे राहणारा प्रशांत सिद्राम मोरे (वय ३३) याच्याबरोबर झाला आहे.लग्नानंतर १३ जुलै २०२४ पासून १९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सतत लग्नात झालेल्या खर्चाची मागणी करून पनवेल येथे रहात असताना काजल यांचा छळ करण्यात आला. याबाबत तिने तक्रार केल्यानंतर तिला आणि तिच्या वडिलांना शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली. असे करण्यात काजल यांचा पती प्रशांत मोरे, सासरा सिद्राम नामदेव मोरे (वय ७०, रा. सेक्टर नं. ४, पनवेल), नणंद प्रियंका विक्रांत चव्हाण (वय ३५, रा. भांडुप, मुंबई) आणि पतीचे मामा शशिकांत योगीराज चव्हाण (वय ६०, रा. कुंडलापूर, ता. कवठेमंकाळ) आदींचा सहभाग होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.