Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री दौरा : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या महाराष्ट्रातील पहिला अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टीची नियोजनबाबत महत्त्वपूर्ण बैठक

मुख्यमंत्री दौरा : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या महाराष्ट्रातील पहिला अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टीची नियोजनबाबत महत्त्वपूर्ण बैठक


सांगली, दि.13 डिसेंबर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आदरणीय नामदार श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025  रोजी आयोजित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा कोअर कमिटी, प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 9 मध्ये तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उंची 21 फूट असून वजन सुमारे ४ टन आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ स्वरूपातील हा महाराष्ट्रातील एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ,  अध्यक्ष प्रकाश ढंग, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीनराजे शिंदे,  प्रदेश कार्यकारिणी सदस्य निता केळकर, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक बाबा शिंदे, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक संतोष पाटील, रोहिणी ताई पाटील, सविताताई मदने, प्रशांत पाटील, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, महिला शहर जिल्हाअध्यक्ष स्वातीताई खाडे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष शांतीनाथ कर्वे, माजी नगरसेवक मनगु आबा सरगर, मोहन बापू जाधव, जिल्हा सरचिटणीस  विश्वजीत पाटील, विशाल पवार, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख,अतुल माने, विजय साळुंखे, संदीप कुकडे, यांच्या सह सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.