आता घरामध्ये दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या पतींसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. नवीन कायद्यानुसार (BNS) जर पतीने दारू पिऊन आपल्या पत्नीला त्रास दिला, तर त्याला थेट तुरुंगात जावे लागू शकते. देशात लागू झालेल्या नवीन भारतीय न्याय संहितेने जुन्या ब्रिटिशकालीन आयपीसी कायद्यांची जागा घेतली आहे. यामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबाबत अत्यंत संवेदनशील आणि कडक तरतुदी केल्या आहेत.
पूर्वीच्या आयपीसी (IPC) ४९८अ च्या जागी आता बीएनएसमध्ये कलम ८५ आणि ८५ब समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता घरामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पतींना सुधरावं लागणार आहे. या नवीन कायद्यानुसार, पत्नीला शारीरिक किंवा मानसिक इजा पोहचवणे हा गंभीर गुन्हा मानला गेला आहे. जर एखादा पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असेल, शिवीगाळ करत असेल किंवा तिला धमकावत असेल, तर तो या कलमांतर्गत दोषी धरला जाईल.जर पत्नीने दारू पिण्यास विरोध केला असेल आणि तरीही पती दारू पिऊन घरी येऊन राडा घालत असेल, तर पत्नी पोलिसांत तक्रार करू शकते. या गुन्ह्यासाठी पतीला ३ वर्षांपर्यंत कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. केवळ मारहाणच नाही, तर दारू पिऊन सतत टोमणे मारणे किंवा मानसिक तणाव देणे हा देखील छळाचा भाग मानला जाईल. जर पती दारूच्या नशेत हुंड्याची मागणी करत असेल किंवा दारूमुळे कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांकडे दुर्लक्ष करत असेल, तरीही पत्नीला कायदेशीर दाद मागता येईल.पती आपल्या पत्नीचा सांभाळ करण्याच्या कायदेशीर जबाबदारीतून सुटू शकत नाही. पीडित महिला संरक्षण, वेगळे राहण्याचा अधिकार आणि पोटगी देखील मागू शकते, असे कायद्यात नमूद करण्यात आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ४०% पेक्षा जास्त घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दारू हे मुख्य कारण आहे. हीच बाब लक्षात घेऊन नवीन बीएनएस कायद्यात महिलांच्या सुरक्षिततेला आणि कौटुंबिक शांततेला प्राधान्य देण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.