Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- लाच घेण्यासाठी व्यवसायिकेला छळलं; पुण्यातील महिला अधिकारी रंगेहात अटक

पुणे :- लाच घेण्यासाठी व्यवसायिकेला छळलं; पुण्यातील महिला अधिकारी रंगेहात अटक


पुणे: पुण्यातील एका महिला अधिकाऱ्याने लाच घेण्यासाठी एका तरुण व्यवसायिकेला अक्षरश: छळून काढले आहे. तक्रार दाखल होताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं आहे.

पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबं धक विभागाने निगुडघर मंडळाच्या मंडळाधिकारी यांना लाच घेताना पकडले आहे. रुपाली अरुण गायकवाड असं आरोपी महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. तिनं 1 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे चौकशीत कबुल केले. या घटनेनंतर प्रशासन व्यस्थेवर मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला अधिकारी विरुध्द एका 23 वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाच्यानुसार,19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीसाठी 200 ब्रास माती वाहतुकीचा कायदेशीर परवाना घेतला होता. यासाठी शासनाकडे 1,26,230 रुपये रॉयल्टीही जमा केली होती. परवान्यानुसार काम सुरू असताना 30 नोव्हेंबर रोजी मंडळाधिकारी गायकवाड यांनी तक्रारदाराच्या गाड्या अडवत, माती वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी केली. 

तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिला होता त्यामुळे गायकवाड यांना राग अनावर झाला त्यामुळे त्यांची माती वाहतूक जाणीवपूर्वक थांबवून ठेवली आणि पैसे दिल्याशिवाय गाड्या सोडल्या जाणार नाहीत, असा दबाव वारंवार टाकला जात होता. अनेकदा कार्यालयात चकरा माराव्या लागल्या. त्यामुळे त्रस्त तक्रारदाराने अखेर 3 डिसेंबर रोजी पुणे ACB कार्यालयात महिलेविरुध्द तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करताना, गायकवाड यांनी पुन्हा एकदा 1 लाख रुपये मागितल्याचे ACB ला स्पष्ट झाले. त्यांनी तक्रारदाराला भोर शहराबाहेरील अभिजीत मंगल कार्यालयाजवळ भेटण्यास सांगितले होते.
एसीबीने रचला सापळा

ठरलेल्या जागी ACB पथकाने सापळा रचला. तक्रारदाराने गायकवाड यांच्याकडे 1 लाख रुपये देताच त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली, आणि त्याच क्षणी ACB अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या भष्ट्राचारामुळे पुणे प्रशासन आणखी एकदा चर्चेत आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.