सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी काही आंदोलकांनी त्यांच्यासमोर फलक घेऊन निषेध व्यक्त केले. तसेच कार्यक्रमस्थळही काहींनी निवेदन दिले. यासह सुरक्षा यंत्रणा भेदून अनेकांनी प्रवेश केला. याबाबत पोलिस, प्रशासनाला धारेवर धरण्यात आले आहे. आज सकाळपासून बैठकांचे सत्र सुरू होते. यातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळताहेत.
अधिक माहिती अशी की, सांगली गेल्या काही दिवसांपासून भयमुक्त, नशामुक्त अभियान सुरू आहे. त्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची वेळ मागितली होती. मात्र, सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना ही भेट नाकारण्यात आली. कार्यक्रमापुर्वी निमंत्रक तानाजी सावंत, सतीश साखळकर, शंभुराज काटकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. दुपारी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॅप्टर कवलापूर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ताफा माधवनगर रस्ता मार्गे कार्यक्रमस्थळी निघाला. त्यावेळी संजयनगर हद्दीत काही आंदोलकांनी फलक हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. त्यानंतर कार्यक्रमस्थळी सुरक्षा यंत्रणा भेदून अनेकजण गर्दी करताना दिसून आले. मुख्यमंत्री सुरक्षा यंत्रणेला आव्हान देणारे कृत्य अनेक कॅमेरात टिपले गेले.काहींनी खुद्द पोलिस अधीक्षकांसमोरच निवेदन दिले. आणि मुख्यमंत्र्यांनी ते स्विकारले. अत्यंत महत्वाच्या दौऱ्या होणारा हा हलगर्जीपणा आता चव्हाट्यावर आला आहे. पोलिस, प्रशासन धारेवर धरले असून सकाळपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून अहवाल मागवल्याचेही समजते आहे. सांगलीतील वरिष्ठ अधिकारी तातडीने सायंकाळी बंदोबस्त कामी असणाऱ्या पोलिस अधिकारी, अंमलदारांची बैठक घेतल्याचेही समजते. लवकरच दोषींवर कारवाईचे संकेत मिळतात. निवडणूकीच्या तोंडावर झालेल्या या कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणेचे दोष आता समोर आले आहेत. वरिष्ठ कोणती कारवाई करणार हे यथावकाश समोर येईल. मात्र, हलगर्जीपणाची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेतली आहे.
ठिकाण बदलेले अन् गोंधळ उढाला
सांगलीत कवलापूर येथे अधिकृत अशी तीन हेलिपॅड बनवण्यात आली आहे. मात्र, काहींच्या हट्टापोटी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात उतरवण्याचा घाट सुरू होता. त्यासाठी हेलिपॅड बनवण्यात आले होते. परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्त, सरावही झाला होता. आदल्यादिवशी रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून दौरा आल्यानंतर कवलापूर विमानतळ निश्चित झाले. त्यानंतर सारा बंदोबस्त त्याठिकाणी नेण्यात आला. यामुळे गोंधळ उडाल्याचे समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.