Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने फोन करुन....', शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट, 'एकनाथ शिंदेंनी फोन स्पीकरवर टाकला अन्...'

'भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने फोन करुन....', शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट, 'एकनाथ शिंदेंनी फोन स्पीकरवर टाकला अन्...'


छत्रपती संभाजीगरमध्ये शिवसेना-भाजपाच्या युतीसंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यादरम्यान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी काही गौप्यस्फोट केले आहेत.

भाजपाचे एक मोठे नेते माझ्या घरी आले, ते म्हणाले तुम्ही 30 जागा लढा बाकी 53 ते लढतील. मी विचारले हे कोणते गणित आहे असा खुलासा त्यांनी केला. तसंच आम्ही द्विधा मनस्थितीत आहोत, युती व्हावी अजूनही इच्छा आहे ते उशीर का करतात कळत नाही असंही म्हटलं आहे.

"शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे संभाजीनगर हातचे जायला नको. आम्ही सगळ्यांनी हे सगळ्यांना सांगितले. आतापर्यंत 9 बैठक झाल्या आहेत. मोठा भाऊ-छोटा भाऊ वाद आम्ही घातला नाही. 6 आमदार एक खासदार असूनही वाद घातला नाही. मोठा भाऊ, छोटा भाऊ म्हटल्याने होत नाही. युती करायची हे प्रमुख होतं. मी बैठकीत आक्रमक झालो हे खुद्द जंजाळ यांना विचारा. आम्ही एक एक प्रभागाबाबत चर्चा केली. सगळे फॉर्म्युला वापरले. निवडून येणाऱ्या जागा आपण ठरवू असे ठरले ते ही केले," असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

'हे कोणते गणित आहे'

"आता सगळं बोलतो., काहीच ठेवत नाही. भाजपचे एक मोठे नेते माझ्या घरी आले. ते आम्हाला म्हणाले 30 जागा लढा, बाकी 53 ते लढतील. मी विचारले हे कोणते गणित आहे. 34 टक्के आपल्याला दिले, 66 टक्के त्यांनी घेतले. भाजपच्या त्या मोठ्या नेत्याने सांगितले आपल्याच लोकांना हे कसले गणित? आपण अखेरचा प्रस्ताव त्यांना दिला त्यात 41 आपल्याला बाकी त्यांना. आम्ही त्यांना 43 जागा देऊन मोठा भाऊ मानले. हे देऊनही त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला नाही. त्यांनी आमचे फोन घेतले नाही. अखेर तुटायला आले," असा खुलासा त्यांनी केला.

'मी त्यांची उधळून काढली'

"मी त्यांना त्या भाषेत बोललो. मी त्यांची उधळून काढली. अखेर शिंदे साहेबांना बोललो, फोन स्पीकर वर टाकला आम्ही सगळे बोललो,. युती होणार नाही वेगळं लढू हे काल संध्याकाळी 9 वाजता ठरलं. आम्ही सोडून दिले. रात्री 12 वाजता एक जण माझ्या कडे आला, म्हणे सीएम डीसीएम याना बोलायचं आहे. सकाळी 4 पर्यंत आम्ही मुंबईत बोलत होतो. अखेर शिंदे साहेब म्हणाले शिरसाठ जाऊ द्या युती होतेय ना. 22 आणि 27 मध्ये अडले सांगितलं. 4 जागा आपल्याला पाहिजे सांगितलं, भाजपने आम्हाला मैत्रीपूर्ण प्रस्ताव दिला होता. मी शिंदे साहेबना सगळं सगळं सांगितलं, सकाळी 4 वाजता पर्यंत बोललो. नंतर ठरले या जागांवर तडजोड करायची. म्हणून 22, 27 प्रभाग या 2 जागा सोडून दिल्या, 2 पावले पुढे मागे गेलो. सीएम डिसीएम सगळे म्हणाले युती करा. म्हटले लोकांना बोलून सांगतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगूनही इथल्या भाजपाच्या मनात काही वेगळे होते," असा दावा त्यांनी केला आहे.

'मी कुणावरही अन्याय केला नाही'

"काहीच झालं नव्हतं तोपर्यंत युती झाल्याची बातमी पसरली. शिवानगर सह, 22 आणि 27 मध्ये 2 घेऊ असे आपण सांगितले. चर्चा सकाळी 4 पर्यंत झाली आणि प्रस्ताव दुपारी 4 वाजता आला. त्यातही ठरल्याप्रमाणे काडी झाली, मी त्यांना म्हटले तुम्हाला युती करायची नाही आणि टांगते ठेवायला लावले म्हणजे आपले अर्ज भरले नाही पाहिजे. मी कुणावरही अन्याय केला नाही, करणार नाही," असं त्यांनी उघड केलं.

'आपल्या मध्ये दुही होऊ देऊ नका, काच तडकू देऊ नका'

"कागद घेऊन गेले आणि आले नाही. आम्ही आता काय करावे? आपल्यात गैरसमज करू नका. त्यांना तेच हवं आहे. माझ्या मतदारसंघात त्यांनी कमी जागा दिल्या काय सांगू आता. मलाही त्रास झालाय , तरी मान्य का करतोय एक पाऊल पुढे मागे चालते. समाधानी आम्ही नाहीय. तुमची सगळी बाजू वर गेली आहे, शिंदे साहेबना बोललो आहे. फक्त आपल्या मध्ये दुही होऊ देऊ नका, काच तडकू देऊ नका, दिलगिरी व्यक्त करतो..तुम्हाला त्रास झाला," असं आवाहन त्यांनी समर्थकांना केलं.

'...तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल'

"शिवसैनिकांचा हा उद्रेक आहे, बैठकीतून निष्पन्न झाले नाही म्हणून हे असे झाले शहरात अनेक ठिकाणी शिवसैनिक नाराज आहे, आमचे सहकारी पक्ष याला गांभीर्याने घेत नाही. युतीबाबत आम्ही सकाळी 4 पर्यंत अडकलो. मात्र कागदावर प्रस्ताव यायला दुपारी 4 वाजले. काही त्रुटी होत्या अजून नव्याने प्रस्ताव आला नाही त्यांच्या मनात काय चाललेले कळत नाही. युती करायची नसेल तर नका करू, पण सीएम डिसीएम मधे आल्यानंतर त्यांच्या आदेशाचे पालन व्हायला हवे. मोठं कोण स्थानिक नेत्यांनी सांगावे, प्रस्तावात चुका दूर झाल्या तर मी आणि अतुल सावे प्रेस घेऊ. आम्ही द्विधा मनस्थितीत आहोत, युती व्हावी अजूनही इच्छा आहे ते उशीर का करतात कळत नाही. आणखी तरी युती झाली असे म्हणता येणार नाही. वाट पाहतोय. शिंदे साहेब जो आदेश देईल ते मान्य करू. सकारात्मक प्रस्ताव आला नाही तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल," असा इशाराही त्यांनी दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.