Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बांगलादेशात हिंदू नागरिकांना कोंडून बाहेरून घरांना लावली आग; भयानक घटनेचा व्हिडिओ आला समोर

बांगलादेशात हिंदू नागरिकांना कोंडून बाहेरून घरांना लावली आग; भयानक घटनेचा व्हिडिओ आला समोर

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना निवडक लक्ष्य करण्याचे प्रकार सुरूच आहेत. नुकतीच पिरोजपूर जिल्ह्यात एक अतिशय भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

या ठिकाणी जळपास पाच ते सहा हिंदू कुटुंबांची घरे पेटवून देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे ही घरं पेटवली तेव्हा सर्व हिंदू कुटुंबे ही घरातच झोपलेली होती.

तर आणखी संतापजनक बाब म्हणजे आग लागल्यानंतर घरात झोपलेल्या हिंदू कुटुंबांना बाहेर येता येऊ नये, म्हणून कट्टरपंथीयांनी आणि उपद्रवींना त्या हिंदू कुटुबांची घरे बाहेर बंद केली आणि जाळली. या भयानक घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बांगलादेशात हिंदू तरुण दीपू चंद्र दास यास बेदम मारहाण करून जाळण्यात आल्याच्या भयानक घटनेनंतर ही घटना घडली आहे. ही घटना २७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर पिरोजपूर जिल्ह्यातील डुमरीतला गावात घडली आहे. यामुळे बांगलादेशातील सहा कुटुंबासाठी २७ डिसेंबरची रात्र ही एक अतिशय भयानक रात्र होती.


रिपोर्टनुसार असे दिसते की, हल्लेखोरांनी पद्धतशीरपणे हिंदू घरांना वेढा घातला. त्यांनी केवळ बाहेरून आग लावली नाही तर पळून जाण्यापासून रोखण्यासाठी बाहेरून दरवाजे देखील बंद केले. जेव्हा कुटुंबातील सदस्य जागे झाले तेव्हा त्यांना संपूर्ण घर आगीत वेढलेले आढळले आणि एकच आरडाओरड सुरू झाली. मृत्यूला तोंड देत कुटुंबातील सदस्यांनी धाडस केले आणि कसाबसा आपला जीव वाचवण्यात त्यांना यश मिळवले. परंतु त्यांचे संपूर्ण घर आणि त्यातील सामान राखेत जळून खाक झाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.