Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोठी घडामोड! शिवसेनेसोबत वाद विकोपाला गेल्याने भाजपा नेतृत्व मोठ्या निर्णयाच्या तयारीत; थेट दिल्लीतून तयारी सुरु

मोठी घडामोड! शिवसेनेसोबत वाद विकोपाला गेल्याने भाजपा नेतृत्व मोठ्या निर्णयाच्या तयारीत; थेट दिल्लीतून तयारी सुरु


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमधील वाद उफाळून आला आहे. शिवसेना-भाजपमधील हा वाद चव्हाट्यावर आला, याचा फटका मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीत बसू नये यासाठी हा वाद सोडवण्यासाठी थेट केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप-शिवसेनेमधला वाद उफाळून आला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देण्यावरून वादंग झाला. त्यानंतर एकमेकांवर जोरदार टोलेबाजी आणि थेट पैसै वाटपावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. इतकंच नाही तर युती तोडण्यापर्यंत या चर्चा पोहोचल्या. अखेर आता भाजप-शिवसेनेमधला हा वाद सोडवण्यासाठी थेट केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.


- नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजप-शिवसेना पक्षातील वाद विकोपाला

- भाजप-शिवसेना वादात केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार असल्याची माहिती

- केंद्रीय नेतृत्व संघर्षावर तोडगा काढणार - सूत्र

- मनपा, झेडपीत फटका बसू नये म्हणून हालचालींना वेग

- निवडणूक निकालानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती
मतभेदाचे मुद्दे काय आहेत यावर दिल्लीत चर्चा होईल अशी माहिती आहे. मुख्यत्वे नगरपालिका निकालानंतर ही चर्चा होऊ शकते. जेणेकरून जिल्हा परिषद आणि पालिकेत नुकसान होणार नाही, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. राज्याच्या मुख्य नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेले नाहीत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. तर वाद सोडवण्याचा प्रयत्न होतोय याचा अर्थ काहीतरी वाद झालाय, असं शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेनंही यात काहीच वाद नसल्याचं म्हटलं आहे. फडणवीस-शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. स्थानिक निवडणूक आहे, त्यामुळे स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यायचे अशा सूचना दिल्या होत्या, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर वाद सोडवण्यासाठी राज्यातील तिन्ही प्रमुख नेते सक्षम असल्याचं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय.
शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली. निवडणुकीत पैसै वाटप होत असल्याचं उघड केलं. यानंतर कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनीच युती टीकवण्यासंदर्भात वक्तव्य केलं. त्यामुळे भाजप-शिवसेनेमधला हा वाद निवडणुकीच्या तोंडावर परवडणारा नाही याची कल्पना महायुतीला आहे. म्हणूनच आता या वादात थेट केंद्रीय नेतृत्वच हस्तक्षेप करणार असल्याची शक्यता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.