नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने ग्रुप डी लेव्हल १ च्या पदांसाठी २२,००० रिक्त जागांची घोषणा केली आहे. ही भरती आगामी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये केली जाईल. या भरतीबाबत १२ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, त्यामध्ये झोननुसार आणि पदानुसार रिक्त जागांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार संपूर्ण तपशील पाहून आपल्या तयारीला सुरुवात करू शकतात.
ग्रुप डी भरती २०२६ सोबतच मंत्रालयाने RRB परीक्षा वेळापत्रक २०२६-२७ देखील जाहीर केले आहे. यामुळे उमेदवारांना रेल्वेच्या आगामी सर्व परीक्षांचे नियोजन योग्य प्रकारे करता येईल. ग्रुप डी अंतर्गत एकूण ११ वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार आहे. या २२,००० जागा सर्व झोनल RRB आणि उत्पादन युनिट्समध्ये विभागल्या गेल्या आहेत.२२,००० पदांच्या घोषणेमुळे लाखो रेल्वे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता अधिकृतरीत्या पदांची संख्या निश्चित झाल्यामुळे उमेदवार त्यांच्या अभ्यासाचे उत्तम नियोजन करू शकतात. तसेच परीक्षा कॅलेंडरमुळे उमेदवारांना वर्षभराच्या भरती प्रक्रियेचा अंदाज आला आहे.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शिक्षण: १० वी उत्तीर्ण किंवा NCVT मान्यताप्राप्त संस्थेतून 'नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट' प्राप्त केलेले असावे.
वयोमर्यादा: किमान १८ वर्षे आणि कमाल ३६ वर्षे.
अर्ज शुल्क आणि पगार
अर्ज शुल्क: जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ५०० रुपये, तर एससी, एसटी, ईबीसी, महिला आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क आहे.
पगार: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २२,५०० ते २५,३८० रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
अर्ज कसा करावा?
२. होमपेजवरील 'Apply Online' या लिंकवर क्लिक करा.३. 'New Registration' लिंकवर क्लिक करून विचारलेली सर्व माहिती भरा.४. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉग इन करा.५. अर्जाचे शुल्क भरा.६. अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.