Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ईश्वरपूर येथे वृंदावन लॉज वरील कुंटणखाना उद्ध्वस्त:, ईश्वरपूर पोलीसांची कारवाई

ईश्वरपूर येथे वृंदावन लॉज वरील कुंटणखाना उद्ध्वस्त:, ईश्वरपूर पोलीसांची कारवाई


ईश्वरपूर : येथील वाघवाडी रस्त्यानजिक वृंदावन लॉजवर सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. याप्रकरणी लॉज व्यवस्थापकासह दोघा एजंटाना पोलिसांनी अटक केली आहे.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या परराज्यातील पीडित युवतीची सुटका करण्यात आली. व्यवस्थापक अभिजित बळवंत पाटील (वय 33, रा. संभाजी चौक, ईश्वरपूर), एजंट अमोल शामराव फार्णे (वय 35, रा. तिरंगा चौक, ईश्वरपूर), परशुराम भास्कर हांडे (वय 30, रा. दत्तनगर, कामेरी रोड, ईश्वरपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सांगली येथील पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला वृंदावन लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी निरीक्षक जोतीराम पाटील यांच्यासह पोलिस अभिजित गायकवाड, महेश गायकवाड, राजेंद्र पवार यांचे पथक ईश्वरपूर येथे दाखल झाले. पथकाने सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास तेथे बोगस गिऱ्हाईक पाठवले होते. त्याने तेथे पैसे देऊन व्यवहार ठरवला. अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री होताच पथकाने तेथे छापा टाकला. लॉजचा व्यवस्थापक अभिजित पाटील, एजंट अमोल फार्णे, परशुराम हांडे यांना पथकाने ताब्यात घेतले. पथकाने तेथे व्यवसायासाठी आलेल्या परराज्यातील युवतीची सुटका केली. बोगस गिऱ्हाईकाने दिलेली रक्कम, संशयितांचे मोबाईल, लॉजवरील रजिस्टर जप्त केले. त्यानुसार तिघांविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक उपनिरीक्षक सुवर्णा गोडबोले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.