सांगली:- मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्र. १७मधून सर्वसाधारण गटातून सुयोगदादा सुतार यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केला होता. मात्र काही कारणास्तव
मी निवडणूक लढवू शकत नाही. मला पक्षाने दिलेल्या सन्मानाबद्दल मी आभार आहे, अशी माहिती स्वतः सुयोग सुतार आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर गीता सुतार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. माजी महापौर सौ. गिता सुतार यांनी महापौर पद भूषविले आहे. त्यामुळे त्याही निवडणूक लढविणार नाहीत मात्र प्रभाग क्र. १७ मधील सर्व भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, यापुढेही आपण भाजपाबरोबरच अविरतपणे काम करू, असेही पत्रकात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.