Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपकडून आयारामांना तिकीट, निष्ठावंतांचा आक्रोश! मंत्री मागच्या दाराने पळाले

भाजपकडून आयारामांना तिकीट, निष्ठावंतांचा आक्रोश! मंत्री मागच्या दाराने पळाले


छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयामध्ये मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. निष्ठावतांना डावलून आयात उमेदवारांना तिकीट दिल्याने भाजपच्या इच्छुकांनी मोठा गोंधळ घातला.

यावेळी एका महिला कार्यकर्त्याने थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पक्षाकडून आम्हाला न्याय हवा आहे, आमच्या एकनिष्ठतेचे हे फळ मिळाले का? अतुल सावेंनी आमच्यासोबत असे का केले? असा सवाल करत नाराज महिला कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला.

तिकीट डावलल्याने भाजपच्या इच्छुकांचा आक्रोश...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरुन भाजपमधील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट डावलून आयारामांना तिकीट दिल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावरुनच अनेक महिला उमेदवारांनी आक्रोश करत आपला राग व्यक्त केला. प्रभाग २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांनीही उमेदवारी डावलल्याने थेट आंदोलन सुरु केले.

मंत्री अतुल सावे मागच्या दाराने पळाले..

काही महिला उमेदवारांनी आत्मदहनाचा इशारा देत आक्रोश केला. यावेळी त्यांना भोवळ आल्याचेही पाहायला मिळाले. 40- 40 वर्ष पक्षाचे काम करुनही आज आम्हाला तिकीट दिले जात नाही. आमचे काय चुकले सांगा? आम्हाला पक्षाच्या वरिष्ठांची भेट घ्यायची आहे, मात्र भेट दिली जात नाही. असे म्हणत या कार्यकर्त्यांनी आक्रोश केला. हा सर्व प्रकार सुरु असतानाच कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून मंत्री अतुल सावेंनी मागच्या दाराने पळ काढला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.