बोगस धनादेश देवून पतसंस्थेची फसवणूक केले प्रकरणी श्री. रामदास रघुनाथ पाटील रा. सांगलीवाडी, ता, मिरज, जि. सांगली यांना सहा महीने कैद व फिर्यादी पतसंस्थेस नुकसान भरपाई रक्कम म्हणून रक्कम रू. 200000/- मात्र देण्याचे आदेश सांगली येथील मे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्री. व्ही. व्ही. खुळपे साो. यांनी पारीत केला. तसेच आरोपी श्री. रामदास रघुनाथ पाटील विरूध्द भारतीय नागरी सुरक्षा संहीता कलम 458 (2) प्रमाणे जेल वॉरन्ट काढण्याचा आदेश दिला.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगलीच्या शाखाः खणभाग, सांगली येथून आरोपी श्री. रामदास रघुनाथ पाटील यांनी रक्कम रू. 125000/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या फेडीपोटी आरोपी यांनी फिर्यादी पतसंस्थेस बोगस धनादेश दिला होता. पतसंस्थेने सदर धनादेश भरला असता तो न वठता परत आला. या प्रकरणी आरोपी श्री. रामदास रघुनाथ पाटील यांचे विरूध्द सांगली येथील मे. अतिरिक्त न्यायदंडाधिकारी साहेब यांचे कोर्टात पतसंस्थेने फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी होवून आरोपी श्री. रामदास रघुनाथ पाटील यांना वरील प्रमाणे शिक्षा झाले. पतसंस्थेच्या वतीने जयवर्धन एन. चौगुले. अॅडव्होकेट, सांगली यांनी काम पाहीले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.