Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

''महिलेच्या स्तनाला हात लावणे बलात्काराचा प्रयत्न नाही'' म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर संतापले CJI सूर्यकांत; कोर्टरुमध्ये नेमकं काय घडलं?

''महिलेच्या स्तनाला हात लावणे बलात्काराचा प्रयत्न नाही'' म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर संतापले CJI सूर्यकांत; कोर्टरुमध्ये नेमकं काय घडलं?


लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयांनी काळजीपूर्वक सुनावणी घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जातील, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणाच्या सुनावणीवेळी आश्चर्यकारक टिप्पणी केली होती. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.


काही दिवसांपूर्वी एका सुनावणीवेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडिताच्या स्तनाला हात लावणे किंवा पायजाम्याचा नाडा सोडणे हा बलात्काराचा प्रयत्न समजला जात नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर याची मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी यावर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केले होते. याच टिप्पणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ''हेच प्रकरण नाही, अलीकडच्या काळात इतरही काही प्रकरणांत उच्च न्यायालयांनी अशाच प्रकारच्या मौखिक आणि लिखित टिप्पणी केल्या आहेत'', असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. यावरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. अशा टिप्पणींमुळे समाजावर आणि पीडितांवर वाईट परिणाम होतो, असं न्यायालयाने म्हटलं.

"जर ही सर्व उदाहरणे न्यायालयांसमोर ठेवू शकत असाल, तर आम्ही संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा विचार करू. संवेदनशील प्रकरणांत अशाप्रकारे टिप्पणी केल्यास पीडितेला जबर मानसिक धक्का बसू शकतो. यातून समाजात चुकीचा संदेश जातो.कधी कधी पीडितांना तडजोडीसाठी दबाव टाकण्यासाठीही अशा टिप्पणींचा वापर होऊ शकतो" असंही न्यायालयाने नमूद केलं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.