Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल


पणजी: नाकाबंदीवेळी आयएएस अधिकाऱ्याची कार अडवून तपासणी केल्याने गोव्यात मोठा गोंधळ झाला. या प्रकरणाची एसपींनी दखल घेऊन नाकाबंदीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला उठाबशा काढायला लावल्या.

राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनीही या प्रकरणी बोलताना एसपींची कारवाई अनुचित असल्याचे मत मांडले. झाले असे की, सांताक्रूझ येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी ये - जा करणाऱ्या वाहनांची तपासणी व चालकांची चौकशी करत होते. दरम्यान, यावेळी एक चारचाकी आली या कारला थांबवून पोलिसांनी चौकशी केली. बीआर नोंदणीकृत कार पणजीच्या दिशेने निघाले होते. पोलिसांनी कार चालकाला लायसन्स दाखविण्याची विनंती केली त्यावेळी चालकाने आयडी कार्ड दाखवत तो आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले.
यानंतर आयएएस अधिकारी कारमधून खाली उतरला आणि त्याने कारमधील सर्व साहित्य खाली फेकून दिले. यानंतर पोलिसांनी कारची तपासणी करण्यास सांगितले. आयएएस अधिकारी पुन्हा कारमध्ये सर्व साहित्य भरुन घटनास्थळावरुन निघून गेला. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची या अधिकाऱ्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली.

आयएएस अधिकाऱ्याच्या तक्रारीची दखल घेऊन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी नाकाबंदीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला फोन करुन पर्वरी पोलिस स्थानकात येण्यास सांगितले व उठाबशा काढण्यास सांगितले. राज्याचे पोलिस महासंचालक यांनी याप्रकरणाची दखल घेऊन एसपी मडकईकरांनी केलेली कारवाई अनुचित असल्याचे म्हटले आहे.
"माझं एसपी मडकईकरांशी बोलणं झालं आहे. मडकईकरांनी नियम पुस्तकीचे पालन करावे, कर्मचाऱ्यांना उठाबशा कढण्यास लावू नये. नाकाबंदीवर असणाऱ्या पोलिसांना योग्य सूचना देण्यात याव्यात तपासणी करताना कशा पद्धतीने वागावे याची माहिती देण्यात यावी, अशी सूचना मडकईकरांनी केली", अशी माहिती आलोक कुमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.