महाराष्ट्रातील राज्यभरातील एकूण २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदार सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आपला हक्क बजावू शकतील. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी, यासाठी सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान करण्याची वेळ सायंकाळी साडेपाचपर्यंत आहे, यादरम्यान जर तुम्हाल मतदान करण्यासाठीचे मतदार ओळखपत्र हरवले असेल किंवा मतदान कार्ड उपलब्ध नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी डिजिटल मतदार ओळखपत्र (e-EPIC) डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. हे डिजिटल ओळखपत्र मूळ पीव्हीसी कार्ड इतकेच वैध असून, ते मिनिटांत आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करता येते.
e-EPIC म्हणजे काय?
e-EPIC (इलेक्ट्रोरल फोटो आयडेंटिटी कार्ड) हे मतदार ओळखपत्राचे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) स्वरूप आहे.हे कार्ड मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येते किंवा कॉम्प्युटरवर प्रिंट करण्यायोग्य स्वरूपात उपलब्ध असते.
फायदे काय?
मतदार हे कार्ड मोबाईलमध्ये स्टोअर करू शकतात, डिजीलॉकरमध्ये अपलोड करू शकतात किंवा त्याची प्रिंट काढून स्वतः लॅमिनेट करू शकतात. डिजिटल स्वरूपात असले तरी, हे कार्ड मतदार ओळखपत्रासाठी तेवढेच वैध आहे.
e-EPIC डाऊनलोड करण्याची सोपी प्रक्रिया
पोर्टलवर भेट द्या: निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जा: https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/खाते तयार करा/लॉगिन करा: NVSP पोर्टलवर तुमचे खाते तयार करा आणि लॉगिन करा.माहिती भरा: तुमचा EPIC क्रमांक (मतदार ओळखपत्र क्रमांक) किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक (Form Reference Number) प्रविष्ट करा आणि तुमचे राज्य निवडा.OTP पडताळणी: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP (वन टाइम पासवर्ड) येईल.डाऊनलोड करा: OTP प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला 'Download e-EPIC' हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.सेव्ह आणि प्रिंट: मतदार ओळखपत्राची एक PDF फाईल डाऊनलोड होईल. ती सेव्ह करून तुम्ही प्रिंट काढू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.