दुचाकी चोरणाऱ्या अकिवाट, ऐतवडे खुर्द येथील दोघांना अटक तीन गुन्हे उघड 3.50 लाखांच्या चार गाड्या जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अकिवाट, ऐतवडे खुर्द येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत 3.50 लाखांच्या चार गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.
निहाल शब्बीर नदाफ (वय २०, सध्या रा. प्लॅट नं.१, स्टार रेसीडेन्सी, निपाणीकर कॉलनी, मिरज, मूळ रा. बस स्टॅण्ड जवळ, अकीवाट, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), मंदार रमेश चांदणे (वय २१, सध्या रा. डॉ. परमशेट्टी हॉस्पीटलचे पाठीमागे, शिवाजीनगर, मिरज, मूळ रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दुचाकी चोरांना पकडण्यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील सुशील मस्के यांना सांगलीतील टिम्बर एरिया येथे दोघे चोरीची दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.पथकाने तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकीबाबत कसून चौकशी केल्यावर त्यांनी शंभर फुटी रस्ता, विश्रामबाग येथील गणपती मंदिर, भारती हॉस्पिटल परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, अतुल माने, रणजीत जाधव, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, सुमित सुर्यवंशी, प्रमोद साखरपे, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.