Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपला मोठा झटका! अध्यक्षांसह 43 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; राणे बंधू एकत्र आल्याने कोकणाच्या राजकारणात मोठा विस्फोट

भाजपला मोठा झटका! अध्यक्षांसह 43 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; राणे बंधू एकत्र आल्याने कोकणाच्या राजकारणात मोठा विस्फोट


राणे बंधू एकत्र आल्याने कोकणाच्या राजकारणात मोठा विस्फोट झाला आहे. ओरोस मंडल अध्यक्षांसह 43 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. कुडाळ तालुक्यातील कुडाळ ग्रामीण तालुकाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होताच आज खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र, या घोषणेनंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद थेट राजीनामा सत्रात उमटले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्यासह 43 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नारायण राणे यांच्या मध्यस्थीने दोन्ही राणे बंधू आले एकत्र
राज्यातील नगरपालिका निवडणुकीत लक्षवेधी राहिला तो सिंधुदुर्ग जिल्हा. नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना आमने सामने पाहायला मिळाले होते. त्यासोबत राणेंचे दोन्ही पुत्र देखील आमने सामने पाहायला मिळाले. मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र दिसणार आहेत. या दोन्ही बंधूंच्या एकत्रित येण्यात नारायण राणेंची मध्यस्थी यशस्वी ठरलीये. आणि आता सिंधुदुर्गसाठी महायुतीचा फॉर्म्युलाही ठरलाय. 50 जागांपैकी भाजपला 31 तर शिवसेनेला 19 जागा दिल्या जातील असं राणे बंधूंनी घोषित केलंय. नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये झालेलं वैर आता संपलं असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे जिल्हा परिषद निवडणुकांना समोरे जाणार आहेत.

नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं आपली ताकद लावत एकला चलो रे भूमिका घेतली होती.केवळ एकला चलो नव्हे तर पैसे वाटपाच्या स्टिंग ऑपरेशनपर्यंत गोष्टी गेल्या होत्या. मात्र या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. ही युती 100 टक्के यशस्वी होईल असा विश्वास नारायण राणेंना आहे मात्र आधी सुरु झालेलं वैर पूर्णपणे संपलंय की त्याच्या काही खुणा अद्यापही आहेत हे येत्या काळात स्पष्ट होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.