Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

45 वर्षांत पहिल्यांदाच.मुंबईवर भाजपची सत्ता, आता कुणाला महापौर करणार?

45 वर्षांत पहिल्यांदाच.मुंबईवर भाजपची सत्ता, आता कुणाला महापौर करणार?


मुंबईसह राज्यातील जवळपास 25 महापालिकेत भाजपने मित्र पक्षांसह विरोधकांचा धु्व्वा उडवलाच. पण मित्र पक्षांचे उधळलेल्या वारूला लगामही घातला. मित्र पक्षांची अवस्था असून नसल्यासारखी झाली. या महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीची जी अवस्था झाली, ती विचार करायला लावणारी आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर उद्धव ठाकरे यांचा वरचष्मा होता. भाजपची देशात लाट आल्यापासून भाजप या निवडणुकीत धडका देत होती. पण यंदा पहिल्यांदाच भाजपला गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठे यश मिळाले. बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आली. आता महापौर कोण होणार याची चर्चा रंगली आहे. तर भाजप मराठी महापौर करणार की हिंदी भाषिक महापौर बसवणार यावरूनही राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपचा मुंबईत झंझावात

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झंझावात दिसून आला. बीएमसीच्या 227 जागांपैकी भाजपला 118 जागांवर विजय जवळ केला आहे. तर सध्या 90 जागा खिश्यात घातल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे सेना 28 जागांवर आघाडीवर आहे. यानिकालातून भाजपने मोठा विजय मिळवल्याचे अधोरेखीत होत आहे. बहुमताच्या आकडेवारीमुळे भाजपचा पहिल्यांदाच मुंबईत महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत भाजपचा कोणताही नेता महापौर होऊ शकला नाही. गेल्यावेळी ती संधी चालून आली असतानाही भाजपने नाराजी असतानाही एकीकृत शिवसेनेच्या महापौराला पाठिंबा दिला होता. महापौर निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला मोठ्या मनाने पाठिंबा दिला होता. आता भाजपने सत्ता मिळवल्याने भाजपचा महापौर कोण होणार याची चर्चा होत आहे.

114 आकड्यांची मॅजिक फिगर
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागा आहेत. महापौर पदासाठी 114 जागांची गरज आहे. सध्याचे निकाल पाहता भाजपचे 90 नगरसेवक तर शिंदे सेनेला 28 जागांचे गणित पाहता या महायुतीकडे 118 जागांचे समीकरण जुळत आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे इतर पक्षांचा टेकू न घेता मॅजिक फिगर महायुती गाठली आहे. आता महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. भाजपकडून मुंबईचा पहिला महापौर होण्याचे भाग्य कुणाला लाभते यावर खल सुरू आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणवणारी भाजप महापौर पदासाठी कुणाचे नाव पुढे करते याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भाजप महापौर पदासाठी कोणता प्रयोग राबवते आणि कुणाला या पदाची सूत्र सोपवते याविषयी चर्चा सुरू आहे. भाजप महिलेला हे पद देणार की गुजराती, हिंदी भाषिकांची वर्णी लावणार यावरही खल सुरू आहे. तर भाजपने यापूर्वी वायदा केल्याप्रमाणे एखाद्या मराठी माणसाला महापौर पदाची लॉटरी लागणार हीच खास चर्चा आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.