अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता 5 हजार रुपयांची लाच सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत समोर आले आहे. यामुळे पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात एकच खळबळ उडाली नाहे. विकास लक्ष्मण ओमासे (वय 39 रा. रूम नंबर 14 दुसरा मजला आनंद बाग सोसायटी सोनारी रोड, सासवड, पुणे (वर्ग-3) असे लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्याच्यावर सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 39 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या व त्यांचे वडीलांच्या विरुध्द सासवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता आरोपी लोकसेवक पोलीस हवालदार ओमासे यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरवातीला 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, तक्रारदार व त्यांचे वडील यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या एन.सी. मध्ये तक्रारदार व त्यांचे वडिलांविरुद्ध कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता सुरवातीस 10 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 5000 रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी लोकसेवक विकास लक्ष्मण ओमासे याला ताब्यातघेऊन त्यांच्याविरुद्ध सासवड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आसायरी शेडगे करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.