Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?

पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?


पुणे: भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ  यांचे तीन दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयागहॉस्पिटल येथे 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला. डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे. माधव गाडगीळ यांच्या निधनाने मोठी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया दिग्गजांनी दिल्या, पण पुण्यात  त्यांच्या अंत्यसंस्काराला अवघे 40 ते 50 लोकच उपस्थित असल्याची खंत एका पत्रकाराने अनुभवातून व्यक्त केली आहे. त्यामुळे, पद्मभूषणपुरस्कारप्राप्त पर्यावरण शास्त्रज्ञांच्या अंत्यविधीबाबत शासन, प्रशासन किती उदासीन असल्याचं वास्तव समोर आलंय.

पायपीट करीत दऱ्या, डोंगर, नद्या पालथ्या घालत पश्चिम घाट अहवाल तयार करणारा करून जंगल, जैवविधततावाचविणारे 'पर्यावरण ऋषी' म्हणजे माधव गाडगीळ सर. त्यांच्या अहवालामुळे सिंधुदुर्गातील तब्बल 70 तरी मायनींग प्रकल्प रद्द झाले. नाहीतरसिधुदुर्गाचे पर्यावरण उध्वस्त होऊन आतापर्यंत मातेरे झाले असते. रत्नागिरीत सुद्धा काही मोठ्या निसर्गहानी करू शकणाऱ्याप्रोजेक्ट्सना माधव गाडगीळ सरांच्या अहवालांनंतर ब्रेक लागला. सातत्याने अभ्यास करून पर्यावरण रक्षणासाठी झटणारा योद्धा आज आपल्यात नाही. मात्र, मरणानंतरही त्यांच्या अंत्यविधीने वेगळ्याच समाजाचं आणि कर्तव्यशून्य प्रशासनाचं दर्शन घडवलं आहे. सध्या सोशलमीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ती वाचून अनेकांनी संताप आणि खेद व्यक्त केलाय. पद्मभूषणनेगौरवान्वित पर्यावरण तज्ञ, कोंकण ते केरळपर्यत पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पर्यावरण संरक्षणासाठी आपली सारी हयात घालविणारेदिवंगतमाधवराव गाडगीळ यांच्या अंत्ययात्रेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या केरळच्या मल्यालममनोरमाचेफोटोएडिटर आर. एस. गोपन यांच्याबद्दलचीAVS Namboodiri यांची ही पोस्ट आहे. जेमतेम 40-50 जण पाहून हादरून जाऊन लिहिलेली ही पोस्ट. समाज म्हणून आपण पार रसातळाला पोहोचलो आहोत, हे दाखवून देणारी ही फेसबुक पोस्ट इंग्रजीत लिहिली आहे.

फेसबुक पोस्टचे मराठी भाषांतर - माधवराव गाडगीळ यांचा अखेरचा एकाकी प्रवास
पुण्यातील नवी पेठ येथील गाडगीळ यांच्या निवासावरून शुक्रवारी जेव्हा त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले, तेव्हा तिथे फारशी गर्दी नव्हती. जेमतेम 40-50 लोक उपस्थित होते. कोणताही व्हीआयपी ,मंत्री किंवा बडा नेता तिथे फिरकला नाही. अगदी स्थानिक आमदारही उपस्थित नव्हते. प्रचंड गर्दी आणि रेटारेटी असेल अशी अपेक्षा धरून आलेले 'मल्याळम मनोरमा'चेफोटोएडिटर आर. एस. गोपन यांना तर आपण रस्ता चुकलो की काय, असे वाटले. हे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार होते, परंतु तिथे तैनात केलेले पोलीस कर्मचारी स्वतःच रस्ता चुकले. त्यांच्या प्रतीक्षेत पार्थिव अर्धा तास तसेच पडून होते. गोपन यांनी पोस्टमध्ये म्हटले की, पद्मभूषण आणि यूएन 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्काराने सन्मानित व्यक्तिमत्त्व तिथे एखाद्या अनाथ व्यक्तीसारखे पांढऱ्या वस्त्रात निजले होते. आजूबाजूची झाडे मात्र शांत उभी राहून, वाऱ्याच्या लहरींनुसार डुलत त्यांना मानवंदना देत होती. गाडगीळ आयुष्यभर झाडांसाठी लढले. "माणसांपेक्षा झाडांमध्येच जास्त कृतज्ञता असते," असे छायाचित्रकाराने म्हटले आहे. "जेव्हा मोठी झाडे कोसळतात, तेव्हा ती एक पानही न हलवता आपली आदरांजली वाहतात." येथील शेवटचा फोटो टिपल्यानंतर, कॅमेरामन गाडगीळ यांच्या आठवणी आपल्या मनात आणि कॅमेऱ्यातसाठवून परतला. गुड बाय, गाडगीळ सर! असे AVS Namboodiri यांनी म्हटलं आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.