पतंगामुळे 70 फुटांवरुन बाईकसह रिक्षावर कोसळलं कुटुंब; बाप आणि मुलीचा जागीच मृत्यू, आईने रुग्णालयात सोडला जीव
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील अत्यंत दु:खद घटना घडली आहे. 70 फूट उंच पुलावरुन खाली पडल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आपली काहीच चूक नसताना त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पतंगीच्या मांज्यामुळे त्यांच्या सुखी आयुष्याचा शेवट झाला. 70 फुटांवरुन बाईकसह खाली पडल्यानंतर ते थेट रिक्षावर कोसळले. बाप आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेने उपचारादरम्यान जीव गमावला.
नेमकं काय झालं?
गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील एका कुटुंबातील तीन जण 70 फूट उंच उड्डाणपुलावरून खाली पडले. पतंगीच्या मांज्यामुळे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात बाप आणि त्याच्या 7 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. बाईक खाली उभ्या असलेल्या एका रिक्षावर जाऊन कोसळली. महिला यामधून वाचली होती, मात्र गंभीर दुखापतीमुळे अखेर तिलाही जीव गमवावा लागला. चंद्रशेखर आझाद उड्डाणपुलावर ही घटना घडली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रेहान नावाचा हा व्यक्ती त्याची पत्नी रेहाना आणि मुलगी आयशासोबत फिरायला गेला होता. रेहाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते उड्डाणपुलावरून जात असताना अचानक रेहानच्या अंगावर पतंगाचा मांजा गुंडाळली गेला. एका हाताने मांजा काढण्याचा प्रयत्न करत असताना, त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. बाईक पुलाच्या भिंतीवर जोरदार आदळली आणि तिघेही 70 फूट खाली पडले. रेहान आणि आयशा यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेहान खाली उभ्या असलेल्या ऑटोरिक्षावर पडल्याने बचावली. तिला गंभीर दुखापत झाली. तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. नंतर गंभीर दुखापतींमुळे तिचा मृत्यू झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.