ताप, थकवा अन् प्रायव्हेट..; AIDSची सुरूवातीची लक्षणे कोणती? पुरूषांच्या शरीरावर दिसतात ही '7' लक्षणे, वेळीच ओळखा
अॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम हे HIV म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे होतो. एचआयव्ही संसर्ग तीन विभगांमध्ये विभागला जातो. एचआयव्ही संसर्ग झाल्यानंतर 2-4 आठवड्यांनी लक्षणे दिसून येतात. एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पुरूषांमध्ये लक्षणे दिसून येतात. कंसल्टेंट पॅथॉलॉजिस्ट डॉ. संतोष सिंह यांनी सांगितले की, एचआयव्हीची सुरूवातीची लक्षणे तीन टप्प्यात दिसून येतात. विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर अंदाजे 3-4 आठवड्यानंतर लक्षणे दिसून येतात.
रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, घसा खवखवणे, ताप, थकवा, हाडे आणि स्नायू दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दिसल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी एचआयव्ही चाचणी करावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. थकवा लवकर येतो. तसेच वजन कमी होण्यास सुरूवात होते. या टप्प्यापर्यंत एचआयव्हीचे निदान करणे महत्त्वाचे आहे.एचआयव्हीच्या पहिल्या स्टेजनंतर क्रोनिक एचआयव्ही होतो नंतर एड्स. एड्समुळे संबंधित व्यक्तीचे मसल मास कमी होते.कॅन्डिडिआसिस किंवा जीभेवर ओरल थ्रश तयार होतो. ज्यामध्ये जिभेवर पांढरा थर तयार होतो. तो सहसा लवकर जात नाही.एड्समुळे बाह्य विषाणूंशी लढण्यास असमर्थ असते. यामुळे सेकेंडरी इंफेक्शन म्हणजेच टीबीसारखे फंगल इंफेक्शन होऊ शकते.प्रायव्हेट पार्टमध्ये संसर्ग होऊ शकतो. यामुळे लघवी किंवा शौचास त्रास होऊ शकतो.तसेच त्वचेवर पुरळ दिसतात. त्वेची जळजळ लवकर बरी होत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.