Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! सरकारी निधीतले 100 कोटी रुपये पार्टी फंडात वळवले? अजित पवारांचा मित्रपक्षांवरच गंभीर आरोप; म्हणाले, 'ती फाईल माझ्याकडे...'

Big Breaking! सरकारी निधीतले 100 कोटी रुपये पार्टी फंडात वळवले? अजित पवारांचा मित्रपक्षांवरच गंभीर आरोप; म्हणाले, 'ती फाईल माझ्याकडे...'


सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवलेले आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मागील 16 वर्षांपासून सिंचन घोटाळ्याचा आरोप केला जात असून 70 हजार कोटींचा अपहार झाल्याच दावा केला जातो.

मात्र यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. या आरोपांबद्दल अजित पवारांनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट विथ कमलेश सुतार' या विशेष कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र मंगळवारी अजित पवारांनी पुरंदर उपसा योजनेत तब्बल 110 कोटींचा घोटाळा झाल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे हा घोटाळा 1995-1996 च्या काळात राज्यात पहिल्यांदाच युती सरकार सत्तेत असताना झाल्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. त्यामुळे नव्याने भाजपा विरुद्ध अजित पवार अशा वादाला तोंड फुटू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
पुरंदर उपसा योजनेत तब्बल 100 कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतची माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. 1999 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं. त्यावेळी अजित पवारांकडे जलसंपदा विभाग आला. तेव्हा कृष्णा खोरे महामंडळाच्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल अजित पवारांकडे आली. त्यात या प्रकल्पाची किंमत 330 कोटी रुपये दाखवण्यात आली होती. त्याबाबत विचारलं असता आधीच्या शिवसेना-भाजप युती सरकार काळात या योजनेची रक्कम पार्टी फंडसाठी 100 कोटीनं वाढवण्यात आली होती असं अजित पवारांनी सांगितलं. त्यावेळी भाजपचे दिवंगत नेते महादेव शिवणकर जलसंपदामंत्री होते. ती फाईल आजही आपल्याकडे असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारवर क्राईम ब्रँचची कारवाई

नरेश अरोरा हे अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहेत. राष्ट्रवादीकडून पैसे वाटप केलं जात असल्याच्या तक्रारीनंतर नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कार्यालयावर कारवाईचा बडगा उगाण्यात आला. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली मात्र त्यात काहीच आक्षेपार्ह आढळून आलं नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान नक्की कोणती कागदपत्रं तपासली आणि तक्रार काय होती याबद्दल पुणे पोलिसांनी बोलण्यास नकार दिला. अजित पवारांनी यासंदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवताना, "तथ्यांच्या आधारेच निष्कर्ष काढावा", असं आवाहन केलंय.

दोन्ही पक्षांमध्ये कटुता
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. असं असतानाच अनेक ठिकाणी अजित पवार आणि भाजपा वेगवेगळे लढत असून प्रचारसभांदरम्यान केली जाणारी टीका ही चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही पक्षांमध्ये या टीकेमुळे कटुता निर्माण होतेय की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.