Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! 'भाऊसाहेबां'मध्ये खळबळ! '24 कोटी'च्या खेळाची पोलखोल; चार तलाठी कोठडीत, आतापर्यंत 24 अटक, प्रशासन हादरलं

Big Breaking! 'भाऊसाहेबां'मध्ये खळबळ! '24 कोटी'च्या खेळाची पोलखोल; चार तलाठी कोठडीत, आतापर्यंत 24 अटक, प्रशासन हादरलं


जालना :- अतिवृष्टी अनुदान वाटप गैरव्यवहार प्रकरणी जालना जिल्ह्यातील महसूल प्रशासन आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईने चांगलच हादरलं आहे. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख रुपयांचा अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार समोर आला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात 28 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास आहे. यातील 18 संशयितांची अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच फेटाळला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख रुपयांचा अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार समोर आला होता. या प्रकरणी अंबड पोलिस  ठाण्यात 28 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास आहे. यातील 18 संशयितांची अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच फेटाळला आहे.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने संशयित आरोपींची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी एकाच वेळी चार तलाठ्यांना अटक केल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. यात विनोद जयजयराम ठाकरे (वय 43, श्रीकृष्णनगर, अंबड रोड, जालना), कृष्णा दत्ता मुजगुले (35, ढालसखेडा, ता. अंबड), गणेश ऋषींदर मिसाळ (34, दुधना काळेगाव, ता. जि. जालना) आणि दिगंबर गंगाराम कुरेवाड (55, चौधरीनगर, जालना) या तलाठ्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. 

या गैरव्यवहार प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकारी अन् त्यांचे एजंट पसार आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांच्या शोधासाठी कारवाई सुरू आहे. हे संशयित स्वतःहून हजर न झाल्यास वेगवेगळे कायदेशीर मार्ग अवलंबण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
काय आहे प्रकरण?

जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अंबड व घनसावंगी तालुक्यातील याद्यांमध्ये सरकारच्या अनुदानाची रक्कम परस्पर लाटल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळणीसाठी चौकशी समिती गठीत केली होती.

चौकशी समितीचा अहवाल अन्...
चौकशी समितीने 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांच्या सरकारी रकमेचा अपहार झाला असल्याबाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात पोलिस ठाणे अंबड इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.