आयोध्येतील राम मंदिर संकुलातील सुरक्षा व्यवस्थेबाबत शंका उपस्थित झाली आहे. एक काश्मिरी मुसलमान तरुणाने राम मंदिर संकुलाच्या दक्षिणेकडील भिंतीच्या परिसरात असलेल्या सीता रसोईजवळ चक्क नमाज पठण सुरु केले.
त्या मुसलमान तरुणाने काश्मिरी पोशाख परिधान केला होता. तो राम मंदिराच्या गेट डी १ मधून आत आला. नमाज पठण करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला अटक केली. त्याचे नाव अहमद शेख आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करताच जिहादी मुसलमानाने घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा दलांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच गुप्तचर संस्था, स्थानिक पोलिस आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सक्रिय झाले. या तरुणाची चौकशी केली जात आहे आणि त्याच्या हेतू आणि पार्श्वभूमीची सखोल चौकशी सुरू आहे. तथापि, जिल्हा प्रशासनाने अद्याप या प्रकरणावर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. राम मंदिर ट्रस्टनेही संपूर्ण घटनेवर मौन बाळगले आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता, कोणत्याही अफवा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती टाळण्यासाठी सुरक्षा संस्था प्रत्येक पैलूची चौकशी करत आहेत. प्रशासनाचे म्हणणे आहे की, श्रद्धा आणि धार्मिक भावना जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.