Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिकेत तब्बल ३१ हजार लोकांनी उमेदवारांना टाळलं, 'नोटा' ला दिली पसंती

सांगली महापालिकेत तब्बल ३१ हजार लोकांनी उमेदवारांना टाळलं, 'नोटा' ला दिली पसंती


ईव्हीएमवर 'नोटा'चा पर्याय आहे, तरीही उमेदवार बिनविरोध कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. याचवेळी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत ३० हजार ९७६ वेळेस नोटाचे बटण दाबले गेले आहे. प्रभाग क्रमांक ७ मधील अनुसूचित जाती (महिला) या गटात ९०४ मतदारांनी 'वरील पैकी एकही नाही' असा पर्याय निवडला आहे. महापालिकेतील ७८ प्रभागांपैकी १८ ठिकाणी पाचशेपेक्षा अधिक मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.

महानगरपालिकेसाठी चार लाख ५४ हजार ४३० मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ७७ हजार ३४६ मतदारांनी हक्क बजावला. सर्वाधिक सांगलीवाडीत ७३.६४ टक्के, तर सर्वांत कमी मतदान विश्रामबाग येथे ५५.३१ टक्के झाले या निवडणुकीत नोटाच्या सर्वाधिक बटणाचा वापर प्रभाग क्रमांक १४ म्हणजे गावभागात करण्यात आला. अ (अनुसूचित जाती महिला) - ८५६, ब (ओबीसी) - ८६९, क (सर्वसाधारण महिला) - ८३२, ड (सर्वसाधारण) - ४५४ असे मिळून ३०११ वेळेस नोटाचा वापर करण्यात आला. पक्षांनी दिलेले उमेदवार आम्हाला मान्य नाहीत, असा संदेश देण्यात आला आहे. अ आणि ब गटात तिसऱ्या नंबरवर 'नोटा'ला मते मिळाली आहेत.

गावभागानंतर, मिरजेतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये २२९५, प्रभाग क्रमांक ४ मध्ये २०००, प्रभाग क्रमांक ६ मध्ये १७९०, प्रभाग क्रमांक ३ मध्ये १७४५, प्रभाग क्रमांक २ मध्ये १६६५, प्रभाग क्रमांक ८ मध्ये १६०५ वेळेस 'नोटा'चा वापर केला आहे. त्याशिवाय प्रभाग क्रमांक १७ मध्ये १७८१, प्रभाग क्रमांक १५ मध्ये १६२७, प्रभाग क्रमांक १९ मध्ये १६२१ 'नोटा'चा पर्याय अवलंबिला आहे.

प्रभाग २ क (५६४), प्रभाग ३ ब (६४२), प्रभाग ४ अ (५५९), ब (६४१) आणि ड (५२५), प्रभाग ६ ड (५४१), प्रभाग ७ अ (९०४), क (८३६), प्रभाग ८ ब (५४४), प्रभाग ९ क (६०३), प्रभाग १५ अ (६४६), प्रभाग १६ ब (५७९), प्रभाग १७ ब (६००), क (५३३), प्रभाग १९ अ (५३६) मध्ये पाचशेपेक्षा जास्त मतदारांनी 'नोटा'चे बटण दाबले आहे. सांगलीवाडीच्या खालोखाल प्रभाग क्रमांक २० मध्ये 'नोटा'चा वापर कमी झाला आहे.
जास्त मतदान, कमी 'नोटा'

सांगलीवाडी, प्रभाग - १३ मध्ये ७३.६४ टक्के मतदान झाले. एकूण २० प्रभागांत हे सर्वांत जास्त मतदान आहे. याठिकाणी 'नोटा'चा सर्वाधिक कमी वापर झाला आहे. अ (ओबीसी) - ६१, ब (सर्वसाधारण महिला) - १२५, क (सर्वसाधारण महिला) - १६० मतदारांनीच 'नोटा'चा पर्याय आजमावला आहे. सांगलीवाडीत मिळून ३४६ वेळेस नोटाचे बटण दाबण्यात आले आहे. सांगलीवाडी ही महानगरपालिका हद्दीत असले तरी, यानिमित्त त्यांनी वेगळेपण जपले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.