कहो दिलसे, काँग्रेस फिरसे' प्रभाग १५ मध्ये घुमू लागल्या घोषणा:, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, सोनल पाटील, स्मिता यमगर यांचा प्रचार जोरात
प्रभाग क्रमांक १५ मधील काँग्रेसचे उमेदवार मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, सोनल पाटील-सावर्डेकर, स्मिता यमगर यांनी प्रचाराची फेरी पूर्ण केली. त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेत नागरिकांशी संवाद कायम राखला आहे. कहो दिलसे, काँग्रेस फिरसे..., अशा घोषणा प्रभागात घुमू लागल्या आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नुराणी मोहल्ला, रमामाता नगर येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा झाल्या. या सभेला फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, स्मिता यमगर, सोनल पाटील-सावर्डेकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या रुक्साना कादरी, सुमय्या मेस्त्री, रूपाली कोळेकर, शशिकला आवळे, शबाना पठाण, विक्रमसिंह पाटील-सावर्डेकर, यमगर व नागरिक उपस्थित होते. मंगेश चव्हाण म्हणाले, नगरसेवक पदाच्या काळात प्रभागातील अनेक समस्या सोडविल्या आहेत. रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांकडे अधिक लक्ष दिले. उर्वरित समस्या सोडविण्यासाठी मतदारांनी काँग्रेसला साथ द्यावी. फिरोज पठाण म्हणाले, प्रभाग १५ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विरोधकांनी खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण मतदार भुलणार नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.