Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपच्या आक्षेपाला "नकार; मैनुद्दीन बागवान उमेदवारी अर्ज वैध ठरला

भाजपच्या आक्षेपाला "नकार; मैनुद्दीन बागवान उमेदवारी अर्ज वैध ठरला


सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये आज महत्त्वाचा निर्णय समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचे अधिकृत उमेदवार अल्लाभक्ष गडकरी यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे.

आज झालेल्या सुनावणीत सादर करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली. कायदेशीर बाबी आणि आवश्यक पुरावे ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बागवान यांचा अर्ज पूर्णतः वैध असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. निर्णय जाहीर होण्यापूर्वी संभाव्य तणाव लक्षात घेऊन महापालिका कार्यालयाबाहेर चौक पोलीस ठाण्याचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकाल लागताच परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली. आक्षेप फेटाळल्यामुळे आता प्रभाग ६ मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असून, सर्वांचे लक्ष प्रचाराच्या रणधुमाळी आणि मतदानाकडे वळले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.