Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सकाळी उठली तर पूर्ण बेडशीट लाल होती, विचार केला बाबा आता., महिला खासदाराचा मोठा खुलासा

सकाळी उठली तर पूर्ण बेडशीट लाल होती, विचार केला बाबा आता., महिला खासदाराचा मोठा खुलासा


सकाळी उठली तर पूर्ण बेडशीट लाल होती, विचार केला बाबा आता माझ्यावर कधीच प्रेम करणार नाहीत… असं वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर, अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी केलं आहे. कंगना राणौत त्यांच्या सिनेमांमुळे कमी पण वादग्रस्त प्रकरणामुळे अधिक चर्चेत असतात पण आता त्यांनी स्वतःच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे. कंगना यांनी पहिल्या मासिक पाळीबद्दल मोठा खुलासा केला आहे. इतर मैत्रिणींना मासिक पाळी झालेली पण आपल्या मुलीला का होत नाही? यामुळे कंगना यांच्या आई कायम चिंतेत असायच्या.

कंगना राणौतम्हणाल्या, ‘माझ्या सर्व मैत्रिणींना सहावी आणि नववीच्या मध्या मासिक पाळी येण्यास सुरुवात झाली होती. पण मला नववीत असताना देखील मासिक पाळी सुरु झालेली नव्हती. त्यामुळे माझी आई कायम चिंतेत असायची. एवढंच नाही तर, मी बहुलीसोबत खेळते म्हणून मला मासिक पाळी येत नाही.. असं माझ्या आईला वाटत होतं.’
‘मी 9 वी इयत्तेत आली, तरी देखील मला मासिक पाळी सुरु झालेली नव्हती. म्हणून माझी आई कायम चिंतेत असायची… तेव्हा पण माझ्या डॉल हाऊससोबत खेळायची… तेव्हा आईला प्रचंड राग यायचा. एक तर मासिक पाळी येत नाही आणि बाहुल्यांसोबत खेळत आहे. त्यामुळे आईने माझ्या सर्व बाहुल्या फेकल्या होत्या. आई मला सांगायची एक दिवस रक्तस्त्राव होईल. तेव्हा माझ्याकडे ये….’ 

‘एक दिवस जेव्हा मी उठली तेव्हा पूर्ण बेडशीट रक्ताने भरलेली होती. मी घाबरली… मी विचार केला, हे सर्व महिलांना प्रत्येक महिन्यात होतं. तेव्हा माझी आई आनंदी झाली. आईने मला जवळ घेतलं… मला मिठी मारली… पण मी विचार करु लागली. बाबा आता माझ्यावर प्रेम करणार नाहीत. मी आता वडिलांच्या जवळ बसू शकत नाही… माझे आई – वडील आता माझ्यापासून दूर होतील…’ असं देखील कंगना म्हणाल्या.
सांगायचं झालं तर, बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत त्यांच्या सिनेमांमुळे कमी पण वादग्रस्त प्रकरणामुळे अधिक चर्चेत असतात. कंगना यांनी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर गंभीर आरोप केले आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील कंगना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता कंगना बॉलिवूडमध्ये कमी तर राजकारणात अधिक सक्रिय आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.