Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेची दूरवस्था सहन करणाऱ्या जनतेचे आश्चर्य : आ विनय कोरे

मिरजेची दूरवस्था सहन करणाऱ्या जनतेचे आश्चर्य : आ विनय कोरे


मिरज : मिरज शहरातील विविध प्रभागात १५ ते २० वर्षे काम होत नाहीत. तरीही निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी उभे राहतात. मिरजेची जनता शहराची दूरवस्था कशी सहन करत आली, याचे आश्चर्य वाटते, असे परखड भाष्य जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, आमदार विनय कोरे यांनी केले.

ते जनसुराज्य वतीने आयोजित सभेत मार्गदर्शक म्हणून बोलत होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्यच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा झाली. त्यावेळी आमदार विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष समित कदम, डॉ. पंकज म्हेत्रे, महादेव कुरणे, अमर पाटील,अशोक माने, संभाजीमेंढे, जयश्री कुरणे, बाळासाहेब कौलापुरे, संतनू सगरे, माजी नगरसेवक डॉ. चंद्रकांत पाटील उपस्थित होते. कोरे म्हणाले, मिरजेच्या दूरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांना जनतेने दूर केले पाहिजे. आजबाजूच्या राज्याशी जोडणारे हे मिरज शहर, मिशन हॉस्पिटल सारखं मोठ आरोग्य देणारं मिरज शहर अशा अनेक अर्थाने ओळखणारे मिरज आहे.

मिरजेमध्ये चांगला रोजगार मिळू शकतात का याबाबत विचार केला पाहिजे.मिरजेचे वैभव आपण राखू शकलो नाही. या प्रभागातील ड्रेनेज व्यवस्थेवर ८५ कोटी रूपये खर्च झाले. तरीही काम अपूर्ण आहे. असे असताना तेच तेच लोकप्रतिनिधी मतं मागण्यासाठी येतात. तीच माणसं वेगळ्या वेगळ्या विचारांमध्ये गुंतवून ठेवतात. आपण इतके वर्षे त्यांना सांभाळलो. त्यांनी काय केलं याचा विचार सुज्ञ जनतेने करावा, असे आवाहन केले.

सत्तेत नसतानाही आपण मिरजेत अनेक कामे केली आहेत. रूईकर पाणंद ओढा पुल बांधण्यासाठी २ कोटी रूपये तसेच ढवळी रस्ता राजीव गांधीनगर ते कमलेश्वर कांबळे मळा रस्ता सुधारण्यासाठी ३० लाख रूपये बोलवाड अंतर्गत रस्ता १० लाख, कोरे मळा अंतर्गत रस्ता ३० लाख असे एकूण ३ कोटी ८८ लाखांचा निधी दिला आहे. मिशन हॉस्पिटल, शासकीय दुध डेअरी बंद अवस्थेत आहे. रेल्वे जंक्शन असतानाही उद्योग निर्माण होत नाही. रेल्वेशी निगडीत असणारं काम उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या हक्काचे उमेदवार निवडून द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.