Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...

महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...


राज्यात सध्या २९ महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवारपर्यंत प्रचाराची मुदत असेल, त्यामुळे प्रचाराला वेग आलाय.

राजकीय पक्षाकडून मतदारांना वेगवेगळी आमिष दिले जात आहे. त्यातच आयोगाकडून आचारसंहिता भंग केलेल्यांवर कारवाई केली जातेय. महापालिका निवडणुकीत आयोगाच्या भरारी पथकाडून आतापर्यंत ८ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय दारू अन् इतर साहित्यही आयोगाकडून जप्त करण्यात आलेय.  महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या 186 तक्रारी राज्यभरात करण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात 8 कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आले. तर निवडणुकीशी संबंधित 38 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गृह विभागाने राज्य निवडणूक आयोगाला आचारसंहितेच्या काळात दाखल गुन्हे, जप्त करण्यात आलेली दारू, रक्कम आदींबाबतचा अहवाल पाठविला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.