Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातील एक दुर्मीळ फळ, जे खाताच ताकद वाढते, मोदींनी नाव घेताच ट्रेंडिंगमध्ये; तुम्हीही कधी ऐकलं नसेल

जगातील एक दुर्मीळ फळ, जे खाताच ताकद वाढते, मोदींनी नाव घेताच ट्रेंडिंगमध्ये; तुम्हीही कधी ऐकलं नसेल


आजच्या धकाधकीच्या आयुष्यात फिट आणि निरोगी राहणं खूप गरजेचं आहे. तब्येतीची योग्य काळजी घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी अनेक जण डाएट करतात, व्यायाम, योग वगैरेंही सुरू असतं. देशातील अनेक राज्यात अनेक पदार्थ बनवले जातता, विविध पदार्थ पिकतातही. त्यातीलचं एक फळ म्हणजे सीबकथॉर्न म्हणजे समुद्री बकथॉर्न(SeaBuckthron). देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नुकतेच एका कार्यक्रमात या फळाबद्दल बोलले होते. त्यांच्या बोलण्यात या फळाचा उल्लेख आल्यावर लोकांनी इंटरनेटवर, गुगलवर या फळाबद्दल सर्च करण्यास सुरूवात केली. नाहीतर तोपर्यंत या एवढुश्या, पिटुकल्या फळाबद्दल कोणाला जास्त माहिती देखील नव्हती. याबद्दलच अधिका जाणून घेऊया.

समुद्री बकथॉर्न. हे एक पर्वतीय फळ आहे असून पिवळ्या केशरी रंगाचं हे छोटंसं फळ म्हणजे अनेक पोषक तत्वांचा खजिना आहे. यामुळेच पंतप्रधानांनीही ते खाण्याचा सल्ला दिला आहे. या डॉक्टरांशी चर्चा केल्यावर त्यांनीही या फळाचे अनेक गुणधर्म, फायदे सांगितले. हे एक फ्लॉवरिंग प्लांट असतं. सी बकथॉर्नचा वापर रस बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. आणि ते फळ म्हणून देखील खाल्ले जाऊ शकते. त्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. एवढंच नव्हे तर त्यामध्ये 190 बायो ॲक्टिव्ह न्युट्रिएंट्सही असतात. म्हणून, पुरुष असो की महिला, हे फळ दोघेही खाऊ शकतात. आरोग्यासाठीही ते खूप फायदेशीर असून त्याचा काही तोटा नाही.
व्हिटॅमिनचा पॉवर पॅक

सीबकथॉर्नमध्ये भरपूर फॅटी ॲसिड असतात, तसेच त्यात अनेक प्रकारचे ओमेगा-3 आणि त्यात भरपूर खनिजंदेखील असतात.तसं पहायला गेलं तर हे फळ म्हणजे एक पॉवर पॅक आहे. गर्भवती महिलादेखील डॉक्टरांचा सल्ला घेऊन या फळाचं सेवन करू शकतात. त्यांच्यासाठीदेखील हे फायदेशीर ठरू शकतं. मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी देखील हे फळ खूप फायदेशीर आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, सी बकथॉर्न ही एक औषधी वनस्पती आहे, ज्याला चुकू फळ किंवा लेह बेरी असेही म्हणतात.

खतरनाक आजारांपासून वाचवतं हे फळ
डॉ. च्या सांगण्यानुसार, सी बकथॉर्न हे फळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच वारंवार होणारी सर्दी, खोकला, विषाणूजन्य संसर्ग , आजार टाळता येतात आणि शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. ते हृदयरोग टाळण्यास आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास देखील मदत करते. एवढंच नव्हे तर शरीरातला रक्तदाब नियंत्रित ठेवते. ते खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. हे फळ पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतं. या फळामुळे गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेपासूनही मुक्ती मिळते. पोटाची जळजळ आणि अल्सरमध्येही हे फळ मदत करतं. तसंच ते त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

हे फळ खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. मुरुमं आणि डाग कमी होतात. केस गळणे कमी होतं आणि त्वचेला आतून पोषण मिळतं. सी बकथॉर्न हे फळ मधुमेहात देखील उपयुक्त आहे आणि रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत करते. इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. यकृत आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यास मदत करते. यकृत विषमुक्त करण्यास मदत होते. फॅटी लिव्हरसाठी तसेच. डोळ्यांसाठीही हे फायदेशीर असून त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.