Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रभाग 17 विकासाचे आदर्श मॉडेल बनवू राष्ट्रवादीचा निर्धार : शाहबाज रंगारी, प्रार्थना शिंदे, साक्षी बोरगावे, दिग्विजय सूर्यवंशी प्रचारात आघाडीवर

प्रभाग क्र. १७ विकासाचे आदर्श मॉडेल बनवू राष्ट्रवादीचा निर्धार : शाहबाज रंगारी, प्रार्थना शिंदे, साक्षी बोरगावे, दिग्विजय सूर्यवंशी प्रचारात आघाडीवर


महापालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक १७ हे विकासाचे आदर्श मॉडेल बनवू. मूलभूत सुविधांपासून ते आधुनिक नागरी सोयींपर्यंत सर्वांगीण विकास केला जाईल. नागरिकांच्या अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध कामे केली जातील, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार शाहबाज रंगारी, प्रार्थना शिंदे, साक्षी बोरगावे, दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

नेमिनाथनगर, गांधी कॉलनी, उदय कॉलनी, किसान चौक, विकास चौक, मोती चौक, तसेच गुलमोहर कॉलनी या भागांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घरोघरी भेटी देत प्रचार केला. या प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. या भेटींना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचाराला चांगली साथ दिली. प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादीचे पॅनेल चांगलेच चर्चेत आले आहे. नागरिकांमध्ये या पॅनेलबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. प्रचारादरम्यान उमेदवारांनी महापालिका क्षेत्रात आदर्श प्रभाग घडवण्यासाठी कामे करण्यावर भर दिला. नागरिकांशी थेट संपर्क, संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे राष्ट्रवादीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी भव्य रॅलीने प्रचार सांगता होणार आहे. रॅलीचा प्रारंभ माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानापासून होणार आहे, तर चांदणी चौकात समारोप होणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.