Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी

Big Breaking!  निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी


राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गुरुवारी १५ जानेवारीला महाराष्ट्रात सर्वत्र मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या एका नव्या निर्णयावर टीका केली आहे. ईव्हीएमला नव्यानं कोणतं मशीन लावलं जाणार आहे? तसेच नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. लोकसभा, विधानसभेला प्रचाराचा जुना नियम बाहेर का काढला नाही? असाही प्रश्न त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी केलेल्या प्रश्नानंतर ईव्हीएमला नव्यानं जोडलं जाणार 'पाडू मशीन' बाबत महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने भूषण गगराणी यांनी आज महानगरपालिका मुख्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी आढावा बैठक घेतली. 
या बैठकीत मतदार यादी, मतदान केंद्रांची व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा, मतदान केंद्राबाहेर मतदारांना मार्गदर्शन, स्वयंसेवकांची नियुक्ती, २३ मतमोजणी केंद्रांची माहिती, मतमोजणी प्रक्रियेत PADU (Printing Auxiliary Display Unit) चा वापर, पोलीस बंदोबस्त, मतमोजणीची कार्यपद्धती तसेच प्रसारमाध्यम कक्षाच्या व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या यंत्रणेची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी (कोकण विभाग) फरोग मुकादम, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांच्यासह अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

'PADU' म्हणजे काय?
'पाडू मशीन' हे मतदान यंत्रातील डेटा वाचणारे आणि कागदावर प्रिंट करणारे साधन आहे.

मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्लेमध्ये बिघाड झाल्यास किंवा त्यातून निकाल दिसण्यात अडचण आली असेल तर 'पाडू' मशीनचा वापर केला जातो.

हे मशीन कंट्रोल युनिटला जोडून त्यातील रेकॉर्ड झालेली मते थेट कागदावर प्रिंट स्वरूपात मिळवता येतात.

यामुळे तांत्रिक बिघाड होऊनही मतमोजणीची प्रक्रिया थांबत नाही आणि उमेदवारांना लेखी निकाल त्वरित पाहता येतो.
वापर कसा होणार?

मतमोजणी करताना पाडू मशीन सर्वात आधी कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मते तपासली जातात. मात्र या जोडणीनंतरही निकाल पाहण्यात अडथळे निर्माण होत असतील तर 'पाडू' यंत्राचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.