Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाच लुचपत प्रतिबंधक विभागानेउपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, नोटांचा डोंगर बघून अधिकारी चक्रावले

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, नोटांचा डोंगर बघून अधिकारी चक्रावले


तेलंगणा येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी हनुमाकोंडाच्या उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डीच्या घरी आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरी एकाचवेळी छापे टाकले. यामध्ये कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली.

या अधिकाऱ्याचे कारनामे याधीही उघडकीस आले होते. यामुळे त्याचे निलंबन देखील झाले होते. प्रभागी जिल्हा शिक्षण अधिकारी असताना 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असताना वेंकट रेड्डी यांना यापूर्वी 6 डिसेंबर रोजी एसीबीने अटक केली होती. त्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना बडतर्फ केले होते. पोलिसांनी अधिक तपासासाठी आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हैदराबाद येथील रॉकी टाउन कॉलनी आणि इतर संबंधित ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात त्यांना 30 लाख रुपयांची रोख रक्कम आणि इतर काही वस्तु आढळून आल्या. एसीबीने विशेष पथकासह आठ ठिकाणी राज्यात धाडी टाकत तपासणी केली असता लाखो रुपयांचे घबाड सापडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेंकट रेड्डीकडे 2008 पासून बेकायदेशीर मालमत्ता होती. त्याच्यावर 2016 आणि 2017 मध्ये नॅशनल हाइवेच्या स्कीममध्ये घोटाळा केल्याचा आरोप होता. यामध्ये त्याने शेतकऱ्यांना मिळालेल्या मोबदल्यात गैरव्यवहार केला असल्याचा आरोप आहे. आतापर्यंत तब्बल 8 करोड 30 लाख रुपयांची बेकायदेशीर संपत्ती आढळून आली आहे. यामध्ये रोख रक्कम आणि सोनेच्या व्यतिरिक्त 6 करोड रुपयांचा एक विला आणि फार्महाऊसचा सहभाग आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस अधिकारी आणि लाचलुचपत विभाग करत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.