Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यसेवा परीक्षेच्या अंतिम निकालात बदल, राज्याला मिळाले सात तरुण उपजिल्हाधिकारी

राज्यसेवा परीक्षेच्या अंतिम निकालात बदल, राज्याला मिळाले सात तरुण उपजिल्हाधिकारी


नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल ऑक्टोबर महिन्यात जाहीर झाला होता. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, हिमालय घोरपडे हे राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.

रवींद्र भाबड हे तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि पात्रतागुण जाहीर केले होते. त्यानंतर आता आयोगाने ५ जानेवारीला पुन्हा एकदा गुणवत्ता यादी पदांसह जाहीर केली आहे. यामध्ये आता गुणवत्ता यादीसह क्रमांकांमध्येही काहीसा बदल झालेला आहे. विशेष यातून राज्याला सात नवीन उपजिल्हाधिकारी मिळणार हे विशेष. भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी आयोगाने १३ जानेवारीपर्यंतची मुदत उमेदवारांना दिली आहे. नवीन उपजिल्हाधिकारी काेण आहेत ते पाहूया. 

राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मेदरम्यान घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या १५१६ उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. या मुलाखती संपल्यानंतर अंतिम निकाल जाहीर झाला. राज्यात प्रथम क्रमांक पटकावणारे विजय लमकणे हे यापूर्वीही एमपीएससीमार्फत विविध सेवांसाठी निवड झालेले अधिकारी असून, सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

या निकालात पुण्याचे समर्थ बालगुडे हे ४२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय बालगुडे यांचे पुत्र आहेत. हा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांसह विविध न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या न्यायिक प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला होता. यानंतर आयोगाने उमेदवारांना पद निवडीची संधी दिली होती. यापुढे सर्वांच्या पदांसह नवीन गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेकांनी मूळ पदे सोडून दुसरी पदे घेतली आहेत. त्यामुळे यादीमध्ये काहीसा बदल झालेला दिसतो. तर ज्या उमदेवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडायचे असेल त्यांना १३ जानेवारीपर्यंत संधी दिली आहे.
हे आहेत क्रमांक एकचे अधिकारी

राज्यसेवा २०२४ चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये मुलींमधून राज्यातून आरती जाधव पहिल्या आल्या असून प्रगती जगताप एससी प्रवर्गातून पहिल्या आल्या आहेत. प्रगती जगताप या सध्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यावर्षीच्या निकालात अनेक मुलींनी बाजी मारली आहे. सात उपजिल्हाधीकारी राज्याला मिळाले असून यामध्ये विजय लमकणे, रविंद्र भाबड, अमित लोकारे, आरती जाधव, नयनसिंग चुंगले, पवन मंगरुळे, प्रिती वालेकर यांचा समावेश आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.