सध्या निर्णय प्रफुल्ल पटेल अन् तटकरे... अर्थमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आल्यावर जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. आज सायंकाळी शपथविधी देखील होण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील यांचा खुलासा
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गाटाचे प्रमुख शरद पवार यांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याबाबत त्यांना काही कल्पना नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना एक वेगळं वळण मिळालं. त्यातच आता आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्या भेटी गाठी अन् त्यांच्या अर्थमंत्रीपदाबाबतच्या चर्चांबद्दल खुलासा केला.
अर्थमंत्रीपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अर्थमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'त्यांचा पक्ष आज तरी किमान फिजिकली आमच्यापासून वेगळा आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय सध्यात तरी दिसतंय तसं सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघं घेत आहेत. काही प्रमाणात भुजबळ साहेब त्यांच्या पक्षाचे निर्णय घेत आहेत. त्यामुळं त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल. त्याची अंमलबजाणी होत असेल. त्याबद्दल मला काही माहिती नाही.' जयंत पाटील पुढे म्हणाले, की, त्यांच्या पक्षाच्या निर्णयाबदद्ल मी बोलणं मला वाटतं की ते योग्य ठरणार नाही.
तटकरेंचे सुतोवाच
दरम्यान, मुंबईत दाखल झालेल्या तटकरे यांना ज्यावेळी शरद पवारांच्या वक्तव्याबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं. यामुळे सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत तुर्तास तरी कोणत्या हालचाली दिसत नाहीयेत.
चर्चेत अजित पवारच होते
दुसरीकडं जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा फार पुढं गेल्याचं सांगितलं होतं. तसंच त्यांनी बोलता बोलता या चर्चेत फक्त अजित पवारच होते. त्यांनी माझा निर्णय इतर सहकारी मान्य करतील असं सांगितल्याचा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.