Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेनं मध्यरात्री मागवलं उंदीर मारायचं विष, डिलिव्हरी बॉयनं ओळखला हेतू, अन् मग जे घडलं ते पाहून अख्खा देश झालाय अवाक्

महिलेनं मध्यरात्री मागवलं उंदीर मारायचं विष, डिलिव्हरी बॉयनं ओळखला हेतू, अन् मग जे घडलं ते पाहून अख्खा देश झालाय अवाक्


एका महिलेनं मध्यरात्री आत्महत्या करण्यासाठी उंदीर मारायचं विष मागवलं होतं. पण डिलिव्हरी बॉयनं तिचा हेतू ओळखला. आणि तिचा जीव वाचवला. हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.

हल्ली लोक ऑनलाइन शॉपिंग करतात. दिवसाचे २४ तास कधीही, काहीही वाटेल ते ऑर्डर करतात. आणि डिलिव्हरी बॉय सुद्धा सकाळी चार वाजल्यापासून रात्री तीन वाजेपर्यंत तुम्ही म्हणाल ती गोष्ट घरी आणून देतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका डिलिव्हरीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका महिलेनं मध्यरात्री उंदीर मारायचं औषध मागवलं होतं. आता तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? कारण ही गोष्ट सामान्य वाटते. पण प्रत्यक्षात हा प्रकार सामान्य नव्हता. कारण ऑर्डर करणारी महिला रडत होती. डिलिव्हरी बॉयनं तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहिले आणि पुढे जे काही घडू शकत होतं, ते त्याच्या प्रसंगावधानामुळे थांबलं. थोडक्यात सांगायचं झालं, तर या डिलिव्हरी बॉयनं त्या महिलेला मृत्यूच्या दारातून परत आणलं.

(फोटो सौजन्य - sasint/pixabay.com, @AAPforNewIndia/X.com)नेमकं घडलं तरी काय?

ही घटना तामिळनाडूमध्ये घडली असून हा व्हिडीओ @AAPforNewIndia या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेनं स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी उंदीर मारायचं औषध मागवलं होतं. मात्र ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयनं तिची अवस्था ओळखून सर्वप्रथम तिला ऑर्डर रद्द करायला सांगितली. त्यानंतर आत्महत्या करणं कसं चुकीचं आहे, हे तिला शांतपणे समजावून सांगितलं. डिलिव्हरी बॉयनं दिलेल्या धीरामुळे महिलेनं आपले नकारात्मक विचार सोडून दिले. या तरुणाच्या हुशारीमुळे एका महिलेचे प्राण वाचले असून नेटकरी त्याचं मोठ्या प्रमाणावर कौतुक करत आहेत.
(फोटो सौजन्य - @AAPforNewIndia/X.com)

नेटकरी करताहेत या तरुणाचं कौतुक​

हा व्हिडीओ आतापर्यंत १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेक युजर्स त्याच्या कृतीचं कौतुक करत असले, तरी काही जणांनी चिंता व्यक्त केली आहे. एका रात्रीसाठी विचार बदलले, पण पुन्हा असं होऊ नये यासाठी पोलिसांना माहिती देणं गरजेचं होतं, अशी मतंही व्यक्त केली जात आहेत.

(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता Sangli Darpan ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.