उत्तरप्रदेशच्या झासी येथे 40 वर्षीय रिक्षा चालक अनिता चौधरीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला आहे. अनिता ही जिल्ह्यातील पहिली महिला रिक्षा चालक होती. तिच्या कुटुंबियाचा आरोप आहे की तिला लुटून तिची हत्या करण्यात आली आहे. मात्र पोलिस अपघात झाल्याचे सांगत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, अनिता चौधरी रात्री 9.30 वाजता रिक्षा घेऊन बाहेर पडली आणि मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास तिच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.
मृत अनीता ही नवाबाद पोलिस स्टेशन परिसरातील तळपुरा येथील आंबेडकर नगर येथे राहत होती आणि झाशीची पहिली महिला रिक्षा चालक होतो. तिने 15 वर्षे काम केले होते. 2020 मध्ये तिचा तिच्या सुपरवायझरशी वाद झाला. सुपरवायझरने तिला रागाने सांगितले, उद्या येऊ नकोस, यामुळे अनिता रागावली आणि तिने काम सोडले. तिला मॅनेजर आणि इतर अधिकाऱ्यांचे फोन आले, पण तिने तक्रार करण्यास नकार दिला.
अनिताचा नवरा, द्वारका चौधरी हा बसस्टँडजवळ हातगाडी चालवतो. घराचा खर्च भागवण्यासाठी ते पुरेसे नव्हते. म्हणून अनिता तिच्या मुलांना घेऊन महाराष्ट्रात गेली आणि 15 दिवसातच कोरोना सुरू झाला आणि लॉकडाऊनची चर्चा झाली म्हणून त्यावेळी ती घरी परतली. महाराष्ट्रातून परतल्यानंतर अनिताच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाकीची झाली. त्यानंतर तिने लोन घेऊन रिक्षा घेतली ती चालवण्याचा विचार केला. सुरुवातीला कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नव्हती. नंतर एका खाजगी बँकेने कर्ज देण्यास होकार दिला.
बँकेचे अधिकारी घरी आले तेव्हा तिच्या पतीने तिला आधार कार्ड आणि त्याचे बँक खाते देण्यास नकार दिला. कुटुंबातील सदस्य अनिताला रिक्षा चालवण्यास विरोध करत होते. कसे तरी अनिताने सर्व कागदपत्रे पूर्ण केली. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी तिने फायनान्सवर एक नवीन रिक्षा खरेदी केली. अनिताला रिक्षा कसे चालवायचे हे माहित नव्हते. शेजारच्या एका रिक्षा चालकाने तिला गाडी कशी चालवायची हे शिकवले. अशा प्रकारे अनिता झाशीची पहिली ऑटो चालक बनली.
घटनेच्या रात्री नेमके काय घडले?
अनिताची बहीण विनिता चौधरी म्हणाली, ती कधी सकाळी तर कधी रात्री रिक्षा चालवायची. दिवसा घरकाम करायची. अशा प्रकारे ती तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. रविवारी रात्री ९:३० वाजता ती ऑटोरिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर पडली. पहाटे १:३० च्या सुमारास आम्हाला स्टेशन रोडवरील सुकवान-धुकवान कॉलनीजवळ अनिता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा फोन आला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. ऑटोरिक्षा उलटली होती आणि अनिताचा मृत्यू झाला होता. तिच्या फक्त डोक्याला दुखापत झाली होती आणि इतर कोणत्याही जखमा नाहीत. त्यामुळे तिचा खून झाल्याचा आम्हाला संशय आहे.विनिता यांच्या मते, जर हा अपघात असता तर जास्त दुखापत झाली असती. शिवाय, तिचे मंगळसूत्र, कानातले आणि मोबाईल फोन देखील गायब आहेत. यावरून असा अंदाज आम्हाला आहे की अनिताला लुटण्यात आले त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि नंतर तिचा मृतदेह फेकून देण्यात आला. रिक्षा देखील उलटण्यात आली. कॅमेरे तपासले पाहिजेत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी अनिताच्या बहिणीने केली आहे.दरम्यान शहर पोलीस मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत गौतम यांनी सांगितले की सध्या हे प्रकरण अपघात म्हणून पाहिले जात आहे. मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कुटुंबाच्या आरोपांवरून तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.