Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात धक्कादायक बातमी, भाजपने ओवेसींच्या एमआयएमशी युती केली, अकोट महानगरपालिकेत चक्रावणाऱ्या घडामोडी

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात धक्कादायक बातमी, भाजपने ओवेसींच्या एमआयएमशी युती केली, अकोट महानगरपालिकेत चक्रावणाऱ्या घडामोडी


'पार्टी विथ डिफरंस' अशी ओळख सांगणाऱ्या भाजपने सत्तेसाठी सारीच तत्व गुंडाळून ठेवलीत का?, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी काँग्रेसशी आघाडी करणाऱ्या भाजपने अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क 'एमआयएम'सोबत  आघाडी केलीये. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत  अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. मात्र, 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं नाहीये. अकोटमध्ये 35 पैकी 33 जागांची निवडणूक झालीय. यात भाजपला 11 जागा मिळाल्यात.

सत्तेसाठी अकोट नगरपालिकेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
अशातच आता अकोट नगरपालिकेत भाजपने आपल्या नेतृत्वात 'अकोट विकास मंच' स्थापन केलाय. या 'अकोट विकास मंचा'त  भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा मित्रपक्ष झालाय. याशिवाय या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी झालाय. कालच या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीये.

आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना भाजपचा 'व्हिप' पाळावा लागणार

भाजपचे नगरसेवक रवि ठाकूर या नव्या आघाडीचे गटनेते असणारायेत. या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा 'व्हिप' पाळावा लागणारेय. 13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणारेय. या आघाडीचे आता सध्याच्या 33 सदस्य संख्येत 25 सदस्य झालेयेत. तर नगराध्यक्षा माया धुळे या 26 व्या सदस्य आहेत. अकोट नगरपालिकेत काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 सदस्य विरोधी पक्षात असणारायेत.

अकोट नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांना भाजपच्या माया घुळे यांनी 5271 मतांनी पराभूत केले होते. अकोट नगरपालिकेत भाजपनंतर एमआयएमचे सर्वाधिक 5 नगरसेवक विजयी झालेयेत. विधानसभेत 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा नारा देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट 'एमआयएम'शी आघाडी केल्याने ते विरोधकाच्या टिकेला कसे उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारेय.

अकोट नगरपालिकेतील पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 35

निकाल जाहीर : 33 (2 जागांची निवडणूक नंतर होणार)

पक्षीय बलाबल :

भाजप : 11

काँग्रेस : 06

शिंदेसेना : 01

उबाठा : 02

वंचित : 02

अजित पवार राष्ट्रवादी : 02

शरद पवार राष्ट्रवादी : 01

प्रहार : 03

एमआयएम : 05

भाजपच्या नेतृत्वात बनलेल्या 'अकोट विकास मंचा'चे पक्षीय बलाबल :

भाजप : 11

एमआयएम : 05

शिंदेसेना : 01

उबाठा : 02

अजित पवार राष्ट्रवादी : 02

शरद पवार राष्ट्रवादी : 01

प्रहार : 03

एकूण 25

शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाला भाजपनं धक्का दिला आहे. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगरपरिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली आहे. काँग्रेसमुक्त देश करणार असल्याची घोषणा भाजप पक्षाने केली आहे. मात्रयानव्याराजकीयसमीकरणानेसर्वत्रमोठीखळबळउडालीआहे. तरदुसरीकडे भाजपा पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगरपरिषदेत बहुमतात येणार असल्याच्यादावाकेलाजातआहे. मात्र ही युती शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.