सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र एकाही पक्षाचे स्टार प्रचारक सांगलीकडे फिरकला नसल्याने प्रचाराची सात मात्र फारशी वाढलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात प्रचार शुभारंभ केला. मात्र त्यानंतर भाजपचा एकही राज्य पातळीवरचा नेता फिरकला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार धावत्या दौ-यात मिरजेत सभा घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या राज्य पातळीवरचे नेते मंडळींनी सांगलीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कारण राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होत असल्याने सर्वच ठिकाणी उपस्थिती लावणे नेत्यांनाही अवघड बनले आहे. सांगली महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात क्रॉस मतदानाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे कोण बाजी मारणार? हे सांगणे सध्या तरी कठीण होत आहे सर्वच पक्षाच्या उमेदवारांना क्रॉस मतदानाचा फटका बसणार आहे. त्यामुळे सांगली महापालिकेत संमिश्र नगरसेवक निवडून येतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ७८ जागांसाठी निवडणूक होत आहे निवडणुकीच्या मैदानात ३०० पेक्षा अधिक उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) आणि अपक्ष असा हा सामना होत असला तरी खरी लढत कोंग्रेरा राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्यातच होत आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात शिवसेना (शिंदे गटाने) हवा करण्याचा प्रयत्न केला. आमदार सुहास बाबर आणि जिल्हाध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे या स्थानिक नेते मंडळीच्या जीवावर निवडणुका जोरदारपणे लढवण्याच्या बलाना करण्यात आल्या. मात्र निवडणूक संपत आली तरी शिंदे गटाचा एकही नेता सांगलीकडे फिरकलेला नाही त्यामुळे शिंदे गटाची अवस्था 'ना घर का ना घाट का? अशी झाली आहे. शिंदे गटासारखीच राष्ट्रवादी (अजित पवार गटाने) निवडणुकीत जोरदार बॅटिंग केली. अनेक माजी नगरसेवकांना पक्षात सामील करण्याचा धडाका लावला, पण केवळ मिरजेपुरतेच (अजित पवार गट) मर्यादित राहिला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समन्वयक माजी खासदार संजय पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, मोहन वनखंडे यांनी ताकतीने लढण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन प्रबळ विरोधी पक्षापुढे त्यांचे फारसं काही चालले नाही. हेच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मात्र सांगली महापालिका निवडणुकीत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सातत्याने संपर्क राखत मतदारांची आणि उमेदवारांशी संपर्क ठेवून एक वेगळा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या जोडीला प्रचारप्रमुख आणि भाजपाचे राज्य उपाध्यक्ष शेखर इनामदार, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवून भाजपाची ताकद वाढेल असा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यानी सांगलीच्या जनतेत एक वेगळा विश्वास निर्माण करण्याचे काम गेल्या आठ-दहा दिवसात केले आहे. तीनही नेते अत्यंत संयमाने आणि एकसंघपणे निवडणुकीची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रिचार्ज झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी नेमक्या कशा पद्धतीने बाजी मारेल? यावरच सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे. मात्र आमदार जयंत पाटील यांनी ज्या विश्वासाने आपल्या सांगलीतील जवळच्या कार्यकर्त्यांवर जी जबाबदारी सोपवली ती जबाबदारी फारशी परिणामकारक झालेली नाही. त्यातही व्याबसायिक दृष्टिकोन ठेवला गेल्याची चर्चा आहे, त्यामुळे मतदारांसह पक्षाचे अनेक कार्यकर्तेही नाराज झाल्याचे चित्र आहे.त्यातच राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने राष्ट्रवादी (शरद पवार) गट आणि काँग्रेसशी अलिखित केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मंत्रीपूर्ण लढती होत आहेत. मतदारांनी नेमकी काय भूमिका प्यायची? असा संथम मतदारात निर्माण झाला आहे. त्यातच नेत्यांकडून मतदारांना जे आवाहन करण्यात येत आहे, विशेषतः गुप्तपणे ते मात्र अनाकलनीय असेच आहे. त्यामुळे सांगलीत यावेळी क्राँरा मतदान शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. या क्रौरा मतदानाचा फटका सर्वच पक्षाच्या उमेदवारांना बसणार आहे. त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीत नेमकी कोणाची सत्ता येणार? हे आज सांगणे अवघड झाले आहे. निवडणूकीच्या सुरुवातीच्या काळात भाजपा एक हाती सत्ता मिळेल असे वातावरण होते. मात्र आता ते वातावरण राहिलेले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांत दादा पाटील वगळता भाजपाच्या एकाही नेत्यांनी या निवडणुकीसाठी फारसा प्रयत्न केलेला दिसत नाही.
मोठा गाजावाजा करत शिवसेना (शिंदे गटा) ने निर्माण केलेला आभास हा आभासच राहिला. अशी अवस्था या निवडणूकीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कारण (शिंदे गटाचे) उमेदवार आज खूपच अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर या तिन्ही नगरांच्या मूलभूत विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक अजिबात झालेली नाही. असे दुर्दैवाने म्हणावे लागते. केवळ मतदाराला खुश करून आपल्याकडे खेचून घेण्यासाठी लागलेली स्पर्धा म्हणजेच, सांगली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अरोव चित्र निर्माण झालेले आहे. पण लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत घातक असा प्रकार आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधारी मंडळी अशा प्रवृत्तींना बळ देत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. सांगली महानगरपालिकेत कोण बाजी मारेल? हा प्रश्न गौण आहे. पण निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेला प्रकार नव्हे गैरप्रकार थांबला तरच आपल्या देशाची लोकशाही अबाधित राहिल असे वाटते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.