सांगली :- सुदृढ आरोग्य ही प्रत्येकाची प्राथमिक गरज असून, त्यासाठी वेळच्या वेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी आयुष्मान भारत योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयुष्मान कार्ड शिबिरांच्या माध्यमातून आपले कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
केंद्र शासन पुरस्कृत आयुष्मान भारत योजनेंतर्गत आयुष्मान कार्ड शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिराच्या माध्यमातून शासकीय अधिकारी, कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच त्यांच्या कुटुंबियांना आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या शिबिरास प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलूके, तहसीलदार लीना खरात, आयुष्मान भारत योजनेचे समन्वयक सुभाष नांगरे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शासकीय यंत्रणेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात पुढाकार घेऊन स्वतः कार्ड काढावे व इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. शिबिरात आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.