राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. काल सकाळी झालेल्या विमान अपघातात अजित पवारांनी अखेरचा श्वास घेतला. अजित पवारांच्या निधनानंतर आता पुढे काय असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. अजित पवारांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याकडचे अर्थमंत्री पद कोणाकडे जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. राज्याचे अर्थमंत्री गेल्यानेच आता अर्थसंकल्प कोण सादर करणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार?
राज्याच्या अर्थसंकल्प मार्च महिन्यात होतो. मागील सहा वर्षे सलग अजित पवार अर्थसंकल्प सादर करतात. दरम्यान, आता अजितदादांच्या निधनानंतर अर्थमंत्री कोण होणार आणि अर्थसंकल्प कोण सादर करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता
राज्याचे अर्थ खात्याचा कार्यभार हा मुख्यमंत्री देवंद्र फडणवीसांकडे जाऊ शकतो. देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजून याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अजित पवारांना मागील सलग ६ वर्षे अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, अजित पवारांनी आतापर्यंतचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण १० वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे जयंत पवार यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अधिवेशनात अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. दर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. २०२६-२७ साठी अर्थसंकल्प कोण सादर करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.