Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रभाग १७ : राष्ट्रवादीच्या प्रचाराचा झंझावातउमेदवार तरुण, सुशिक्षित; विकास कामांच्या जोरावर वाढता प्रतिसाद

प्रभाग १७ : राष्ट्रवादीच्या प्रचाराचा झंझावात उमेदवार तरुण, सुशिक्षित; विकास कामांच्या जोरावर वाढता प्रतिसाद


प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, साक्षी बोरगावे, प्रार्थना शिंदे, शाहबाज रंगारी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा, बैठका, पदयात्रांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रचाराचा झंझावात तयार झाला आहे. उमेदवार तरुण, सुशिक्षित आहेत. विकास कामांच्या जोरावर वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, प्रगती कॉलनी, नागराज कॉलनी व शांतिसागर कॉलनी या परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या.

याप्रसंगी माजी महापौर व उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, प्रभागात यापूर्वी करण्यात आलेल्या विकास कामांची आज नागरिकांकडून पोहोचपावती मिळत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व मूलभूत सुविधांसाठी केलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. तोच विश्वास या पदयात्रेतून स्पष्टपणे दिसून येत आहे. आगामी काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल. महिलांसाठी सुविधा, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व सामाजिक सुविधा या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाईल. नागरिकांनी दिलेला पाठिंबा हीच विकास कामांची खरी पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकासाला गती देण्यात येईल. पदयात्रेदरम्यान महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत प्रचारात स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवला. एकूणच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.