बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. मात्र, जसा तपास पुढे सरकत आहे, तसे या अपघाताचे भयानक वास्तव समोर येत आहे. या अपघातातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे अजित पवार वापरत असलेल्या 'Learjet' विमानाबाबत अमेरिकेच्या 'नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डा'ने (NTSB) आधीच धोक्याचा इशारा दिला होता.
या विमानांच्या लँडिंग गिअरमध्ये दोष असल्याचे सांगत तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याच मॉडेलचे विमान आज बारामतीत कोसळले, ज्यामुळे विमान कंपनीच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज सकाळी बारामतीत कमालीचे दाट धुकं होते. बारामतीसारख्या छोट्या विमानतळावर ILS (Instrument Landing System) उपलब्ध नाही. ही यंत्रणा नसल्यास वैमानिकाला केवळ डोळ्यांनी पाहून विमान उतरवावे लागते. धुक्यामुळे धावपट्टी दिसत नसल्याने वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न सोडला, आकाशात घिरटी घातली आणि दुसऱ्यांदा प्रयत्न केला. मात्र, शंभर फुटांवर असतानाच अपघात झाला.बारामतीचा रनवे हा ‘टेबल टॉप’ प्रकारचा आहे. अशा धावपट्टीवर लँडिंगसाठी अचूकतेची गरज असते. जमिनीपासून केवळ १०० फूट अंतरावर असताना विमानाचे संतुलन बिघडले आणि ते धावपट्टीऐवजी बाजूच्या जमिनीवर आदळले. आदळताच स्फोट झाले आणि मदतीची संधीही उरली नाही. अपघाताच्या काही सेकंद आधी वैमानिकाने ‘MAYDAY’ (मे-डे) कॉल दिला होता. विमानचालक जेव्हा अत्यंत आणीबाणीच्या स्थितीत असतो. याचा अर्थ वैमानिकाला तांत्रिक बिघाडाची जाणीव झाली होती, पण विमानाला सावरणे त्याच्या हाताबाहेर गेले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.