Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेतील ढेरे टोळीवर ' मोका'ची कारवाई :, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा कारवाईचा दणका

मिरजेतील ढेरे टोळीवर ' मोका'ची कारवाई :, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा कारवाईचा दणका


मिरज: मिरज शहरातील  निखिल विलास कलगुटगी खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १५ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लागू केला आहे. मा. विशेष  पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र श्री. सुनिल फुलारी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, या कारवाईमुळे मिरज शहरातील संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा मोडला आहे.

तपासात टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे व त्याच्या साथीदारांनी २०१७ ते २०२५ दरम्यान मिरज परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दरोडा, गंभीर दुखापत व बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांची मालिका केल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते.  सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असून, यापुढेही संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कडक व निर्णायक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.