Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य; "हिंदू समाज तेव्हाच पराभूत झाला जेव्हा.."

मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य; "हिंदू समाज तेव्हाच पराभूत झाला जेव्हा.."


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू एकतेबाबत सनातनींसाठी मोठा संदेश दिला आहे. सगळ्या हिंदूंनी जातीभेद, मतभेद विसरुन एक झालं पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा भेदाभेद नको असं महत्त्वाचं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. मथुरा येथील वृंदावनमध्ये सनातन संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोहन भागवत यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मोहन भागवत यांचं सनातनींना आवाहन
मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले, आपल्या देशातील संतांची शिकवण आठवा. सगळ्यांनीच आपल्याला भेदाभेद दूर ठेवण्याचा संदेश दिला आहे. भारताची ही सध्याची गरज आहे की भारतातील हिंदू समाजाने एक झालं पाहिजे आणि सगळे भेद, मतभेद विसरले पाहिजे. हिंदू समाजाचा, राजांचा पराभव तेव्हाच झाला आहे जेव्हा समाज विभागला गेला किंवा त्यात फूट पडली. हिंदू समाजातले अंतर्गत वाद हेच आपल्या समुदायाचं नुकसान करत आले आहेत, पराभूत करत आले आहेत. त्यामुळे माझं तुम्हाला हे आवाहन आहे की हिंदू म्हणून एक व्हा, कुठलाही भेदभाव बाळगू नको. तुम्हाला मैत्री करायची आहे हे लक्षात ठेवा, आपल्याच माणसांना वैरी समजू नका.

हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे ही आपली गरज-भागवत

मोहन भागवत पुढे म्हणाले, आपण जितकं फिरु, समाजात वावरु तेवढं आपल्याला समाजाबाबत समजेल. हिंदू समाज हा एक आहे. पण जग आपल्याला जाती, भाषा, धर्म, पंथ, संप्रदाय म्हणून पाहतं. जगाचा हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जगात जेवढे हिंदू आहेत, त्यांनी हिंदू समाजातील व्यक्तींशी मैत्री केली पाहिजे, सौहार्द बाळगला पाहिजे. एकमेकांच्या घरी जाणं, बरोबर जेवण करणं, एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी होणं या गोष्टी हिंदू समाजातील सगळ्याच व्यक्तींनी केल्या पाहिजेत. हिंदू समजाने एकत्र आलं पाहिजे ही आपली गरज आहे, असंही मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात म्हटलं आहे. जनसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

१ जानेवारीला काय म्हणाले होते मोहन भागवत?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी १ जानेवारी रोजी छत्तीसगढच्या रायपूरमध्ये असलेल्या श्रीराम मंदिरात पूजा अर्चना केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले होते की देशभरात आता हिंदू संमेलनं आयोजित केली जात आहेत. आपल्यासाठी ही संधी आहे, आपली जबाबदारी ओळखून आपण वागलं पाहिजे असा सल्ला त्यावेळी त्यांनी दिला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.