एका तरुणावर क्रूरतेची सीमा ओलांडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर पोलीस ठाण्यात ताब्यात असलेल्या एका तरुणावर क्रूरपणे हल्ला करत त्याला संपवलं. नंतर तरुणाला अमानुषपणे वागणूक दिली. जखमी असलेले मनीष कुमार हे गंभीर आजारी पडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ताजपूर रुग्णालयात दाखल केले, नंतर त्याच्यावर चांगले उपचार करण्यासाठी समस्तीपूर रुग्णालयात पाठवले होते. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
पीडित तरुणाने सर्व सांगितलं..
पीडित मनीषने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला, दरम्यान तो ताजपूर बाजारातील सोनी ज्वेलर्समध्ये काम करतो. काही दिवसांपूर्वी दुकानातून चोरी झाल्याचा संशय मनीषला बळावला गेला आणि नंतर त्याला ओलीस ठेवण्यात आले होते, नंतर मारहाण केली आणि पोलिसांकडे देण्यात आले होते.
'सुईने इंजेक्शन दिलं आणि गुप्तांगात पेट्रोल ओतलं...'
मनीषने आरोप केला की, पोलिसांनी त्याला चार दिवस ताब्यात ठेवले आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. नंतर त्याने दावा करत सांगितलं की, त्याला कोठडीत डांबले होते तेव्हा बेदम मारहाण करण्यात आली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला सुईने इंजेक्शन दिलं होतं. नंतर त्याच्या गुप्तांगात पेट्रोल ओतले होते. तेव्हा पोलिसांनी त्याच्या पत्नीवर हल्ला केला आणि संपूर्ण कुटुंबाला धमकावण्यात आले होते, असा पीडिताचा आरोप आहे. दरम्यान, 4 जानेवारी रोजी वैयक्तिक जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, व्हायरल झालेल्या संबंधित व्हिडिओच्या आधारे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसडीपीओ-1 यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.