लॉटरीमध्ये जिंकला १२९ करोड, पण पैसे घेण्यास तयार नाही, सरकारचं वाढलं टेंशन, आता या पैशांचं करायचं काय?
लॉटरी जिंकून झटपट श्रीमंत व्हायचं स्वप्न आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. काही जणांनी तर प्रत्यक्षात लॉटरी काढून कोट्यवधी रुपये जिंकण्याचा प्रयत्नही केला असेल. पण ज्याच्या नशिबात असतं तोच लॉटरी जिंकतो. असो, पण हे सांगण्याचं कारण म्हणजे यूकेमध्ये अशी काही नशिबवान लोकं आहेत, ज्यांनी कोट्यवधींच्या लॉटऱ्या जिंकल्या आहेत. मात्र पैसे घेण्यासाठी ते अद्याप समोर आलेले नाहीत. आता खुद्द नॅशनल लॉटरी विभागाचे अधिकारी त्यांना पैसे घेऊन जाण्याची विनंती करत आहेत. होय, हा चक्रावून टाकणारा प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य - u_1nl4askhcx/pixabay.com)
तर प्रकरण असं आहे की, एका व्यक्तीनं १० ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या लॉटरी ड्रॉमध्ये तब्बल १०.६ दशलक्ष पाउंड, म्हणजे जवळपास १२९ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला. मात्र आज २१ जानेवारी २०२६ उलटून गेल्यानंतरही तो आपलं बक्षीस घेण्यासाठी समोर आलेला नाही. त्यामुळे लॉटरी विभाग चिंतेत आहे. त्यांनी विविध माध्यमांतून या व्यक्तीला आवाहन केलं आहे की ठरलेल्या अंतिम मुदतीपूर्वी पैसे घ्यायला यावं. अन्यथा ही रक्कम मिळणार नाही. मात्र अद्याप हा व्यक्ती समोर आलेला नाही. बहुधा आपण करोडपती झालो आहोत, याची त्याला कल्पनाच नसावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
यूके नॅशनल लॉटरीने दिलेल्या माहितीनुसार, जर हा व्यक्ती पैसे घेण्यास आला नाही, तर ही रक्कम सरकारी खजिन्यात जमा केली जाईल आणि त्यातून समाजविकासाची कामं केली जातील. हा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वीही लोकांनी लाखो-कोट्यवधींची बक्षिसं जिंकली, पण पैसे घेण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता सांगली दर्पण ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.